Bigg Boss Marathi | असा आहे पॅडी..दुसऱ्याच्या; हास्यजत्रा फेम विशाखाने शेअर केला पॅडी कांबळे बरोबरचा 'तो' किस्सा
Highlights:
- Bigg Boss Marathi
- मागील आठवडा पॅडी भाऊंनी गाजवला
- नेमकं काय म्हणाल्या विशाखा?
- भरपूर मोठे कॅप्शन लिहिलं आहे
Bigg Boss Marathi | बिग बॉसच्या घराने आता एक वेगळंच वळण घेतलेलं दिसतंय. प्रत्येकजण खेळासाठी नमुन दिलेल्या टीममध्ये खेळाविषयी चर्चा करताना दिसत आहेत. दरम्यान नुकताच भाऊचा धक्का पार पडला. अनेक खेळ आणि गंमत जंमत पाहायला मिळाली. त्याचबरोबर पंढरीनाथ कांबळे यांना चक्रव्यूव रूममधील त्यांच्याच टीममधील सदस्यांची व्हिडिओ दाखवण्यात आली. ज्यामुळे पॅडी भाऊंचं मन कुठेतरी नाराज झाल्याचं पाहायला मिळालं.
मागील आठवडा पॅडी भाऊंनी गाजवला
त्याचबरोबर मागील आठवडा पॅडी भाऊंनी गाजवला अशी कॉम्प्लिमेंट देखील त्यांना रितेश भाऊंकडून मिळाली. त्याचबरोबर एका टास्कनंतर बिग बॉस यांनी सर्वांना लिविंग एरियामध्ये बोलावून फर्निचर, उकडलेले अन्न या सर्व गोष्टींची जाणीव करून दिली. त्यानंतर गार्डन एरियामध्ये बसल्यावर पॅडी भाऊंना बिग बॉस यांच्या शब्दांमुळे रडू अनावर झालं.
नेमकं काय म्हणाल्या विशाखा?
अंकिता आणि जानवी त्यांना गप्प करण्यासाठी लगेचच धावून आल्या. पॅडीच्या या साधेभोळेपणावर हास्य जत्रा फेम विशाखा सुभेदार यांनी ‘आपला पॅडी का रडला???’असं म्हणत भलं मोठं कॅप्शन लिहून पॅडी बरोबरचा प्रवासादरम्यानचा एक किस्सा त्यांनी शेअर केला आहे. नेमकं काय म्हणाल्या विशाखा? पाहून घेऊ.
भरपूर मोठे कॅप्शन लिहिलं आहे
विशाखा यांनी भरपूर मोठे कॅप्शन लिहिलं आहे. त्यांनी किसता सांगत असं लिहिले की,”आपला पॅडी का रडला??? खरं सांगू का.. ह्यातला हा माणूस त्याच्या जवळच्या अनेक मित्रमंडळींनी पाहिलाय.. अत्यंत प्रामाणिक आणि भावनाप्रधान, मदत करणारा, दयाशील असा आमचा पॅडी.. पंढरीनाथ. एक किस्सा आठवला.. असंच आम्ही प्रयोगाला जात होतो, रस्ता चुकला म्हणून बस थांब्यावर असलेल्या एका बाईला रस्ता विचारला, तर तिने रस्ता सांगताना अरे तुम्ही तर माझ्याच घरावरून जाणार, माझ्या घरावरून पुढे गेलात ना की मग डावीकडे वळलं की मग थोडे उजवीकडे वळले की तुमच्या ठिकाणी.. असं म्हणाली.
त्यावर पॅडी म्हणाला की अहो काकी आम्हाला तुमचं घर कुठे माहिती आहे. हसलो.. त्यावर तिने हसून पुन्हा एकदा रस्ता सांगितल.. आणि आणि आम्ही थोडं पुढे गेलो.. त्यांनी मध्येच गाडी थांबवायला सांगितली.. मला म्हणाला अगं आपण त्या बाईच्या घरावरनं जाणार मग आपण तिला का घेतलं गाडीत?? आम्ही मागे गेलो आणि त्या बाईला त्यांनी गाडीत बसवलं.. संपूर्ण प्रवासात आमच्या गप्पा चालल्या होत्या तिचा नवरा त्यांची मासेमारी ची बोट त्यावरचे कामगार सगळं.. तिने काही आम्हाला दोघांना ओळखलं नव्हतं.. तिचं आपलं दर काही वाक्यांनंतर चालू होतं” बाई पहिल्यांदा एवढ्या मोठ्या गाडीत बसले. “कधीच नाही बसले ग गाडीत.. नुसत्या गाड्या तोंडासमोरून गाड्या जायच्या, बसले कधीच नव्हते आज पहिल्यांदा बसले.. ते पण एवढ्या मोठ्या गाडीत..! मग तिला तिच्या घराजवळ उतरवलं.. आणि मग तिला पॅडी ने विचारलं, या बाईला ओळखतेस का तू? मग टीव्ही मध्ये शुभविवाह दुपारची सिरीयल लागते त्यात काम करते रागिनी.. हे सांगितल्यावर तिने ओळखलं.. साडीचा वेगळ्या दिसता तुम्ही.. भूमी आकाश रागिनी वाली सिरीयल.. मी तर गाडीच्या नादात होते तुमच्याकडे तसं निरखून पाहिलं नाही.. असं म्हणाली.. आभार वगैरे मानून ति निघून गेली. तिचा आनंद पाहून पेडीला आनंद होत होता”.
View this post on Instagram
त्याचबरोबर पुढे विशाखा लिहते की,” आपल्या आईला सोडलं असं feel होत होतं.. त्यानंतर पुढच्या प्रवासात आम्ही दोघेही अबोल.. त्यानं त्याच्या आईला आणि मी माझ्या बापाला कवटाळून प्रवास केला.. असा आहे पॅडी! दुसऱ्याच्या सुखदुखात साथ देणारा.. त्याची शिकवण्याची पद्धत अशीच आहे.. थोडी टोमणे मारत मारत पण एकदा का गाठ बसली की कायमची.. त्याचे टोमणे बोल अमृताची फळ वाटतात कारण तो फार कमी वेळा तसं बोलतो.
आणि गरज पडली तरच.. सुरज पहिल्या दिवसापासूनच बेडवर पॅडीच्या बाजूला झोपला.. त्यावेळी त्यांची ओळखही नव्हती..हा… आलय? एक पासून त्याची काळजी घेणे त्यात फक्त माया आहे असणार.. त्याच्या वागण्याबोलण्यात कुठला स्वार्थ असता तर तो आज कुठल्याकुठे असता..” दोघांचा असा रंजक आणि भावनात्मक किस्सा सांगत विशाखाने पॅडी भाऊंचं कौतुक केलं आहे.
Latest Marathi News | Bigg Boss Marathi season 5 actress Vishakha Subhedar share post for Pandharinath Paddy Kamble 16 September 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News