विकीपिडीयावर मराठी आईचं नावं मुस्लिम केलं | पती देखील लक्ष | उर्मिला ट्रॉलर्सवर भडकली
मुंबई, १९ डिसेंबर: अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने सक्रिय राजकारणात प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांना समाज माध्यमांवर लक्ष करण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे आणि त्यात केंद्रस्थानी धर्म ठेवण्यात आल्याचं दिसतंय. काही दिवसांपूर्वीच उर्मिलाने शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेशही केला आहे. राजकारणातही त्या तोडीसतोड प्रतिउत्तर देण्यात माहीर आहेत. अलिकडेच उर्मिला मातोंडकर यांना त्यांच्या पतीच्या धर्मावरुन ट्रोलर्सने लक्ष्य केलं. त्यावर उर्मिला मातोंडकर यांनीही ट्रोलर्सना चांगलंच सुनावलं आहे. उर्मिला मातोंडकर यांच्या विकीपीडिया पेजवरही काही नमुन्यांनी आक्षेपार्ह बदल केले होते असं त्या म्हणाल्या.
यासंदर्भात मोजो स्टोरीशी बातचीत करताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या, ‘माझे पती मोहसीन अख्तर मीर ( Mohsin Akhtar Mir) यांच्याबद्दल समाज माध्यमांवर उलट्या-सुलट्या अफवा पसरवल्या जात आहेत. मोहसिन यांना दहशतवादी आणि पाकिस्तानी म्हटलं गेलं. काही लोकांनी माझ्या विकीपिडीया पेजवर बदल केले होते. त्यात माझ्या आई-वडिलांचं नाव बदलण्यात आलं. आईचं नाव रुखसाना अहमद आणि वडिलांचं नाव शिविंदर सिंह असं करण्यात आलं होतं.’ त्यांच्या वडिलांचं खरं नाव श्रीकांत मातोंडकर आणि आईचं नाव सुनीता मातोंडकर आहे.
बॉलीवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचे पती मोहसिन अख्तर मीर यांचं 2016 मध्ये लग्न झालं होतं. ते काश्मिरी मुस्लीम आहेत आणि पेशाने मॉडेल आणि व्यावसायिक आहेत. त्यांच्या लग्नाची बरीच चर्च रंगली होती. तेव्हाही त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं. आता उर्मिला राजकारणात सक्रीय झाल्यानंतर पुन्हा एकदा त्या दोघांना ट्रोल करण्यात येत आहे. उर्मिला मातोंडकर यांनी धर्मावर किंवा लग्नावरुन ट्रोल करणाऱ्या लोकांबद्दल संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी लव्ह जिहादवरून महाराष्ट्रीतील नेतेमंडळींमध्ये द्वंद्व रंगल्याचे दिसत असतानाच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी एक वक्तव्य केलं होतं. “लव्ह जिहाद हा केवळ भारतीय जनता पक्षाचा अजेंडा आहे. भारतीय जनता पक्ष या मुद्द्यावरून केवळ शब्दांचा खेळ करताना दिसत आहे. लव्ह जिहाद कुठे झालाय? हे आम्ही भारतीय जनता पक्षाला नक्कीच दाखवून देऊ. पण लग्न हा मुला-मुलीच्या पसंतीचा विषय आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते मात्र यावरून केवळ राजकारण करू पाहत आहे”, असा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला होता.
News English Summary: Talking to Mojo Story, Urmila Matondkar said, “Rumors about my husband Mohsin Akhtar Mir are being spread on social media. Mohsin was called a terrorist and a Pakistani. Some people made changes to my Wikipedia page. My parents’ names were changed. His mother’s name was Rukhsana Ahmed and his father’s name was Shivinder Singh. ‘His father’s real name is Shrikant Matondkar and his mother’s name is Sunita Matondkar.
News English Title: Bollywood actress and Shivsena leader Urmila Matondkar angry over trollers after targeting her husband Mohsin Akhtar Mir news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News
- Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट