19 April 2024 11:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

आम्ही युतीला मतं दिली; आता भांडून हे आम्हाला मूर्ख बनवत आहेत: अशोक पंडित

Bollywood Producer Ashoke Pandit, Shivsena, BJP, Maharashtra Vidhansabha Election 2019

मुंबई: महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये २१ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुका झाल्यानंतर दोन्ही राज्यात कोणाचे सरकार स्थापन होईल याबद्दल देशात बरीच चर्चा रंगली आहे. एकीकडे हरियाणामध्ये कॉंग्रेसने भाजपला जोरदार टक्कर दिल्याचे पाहायला मिळाले, तर दुसरीकडे महाराष्ट्रातील भाजप आणि शिवसेना यांच्या युतीला २८८ जागांपैकी १६१ जागा मिळाल्या आहेत. मात्र, या विजयानंतरही मुख्यमंत्रीपदाच्या पदा संदर्भात दोन्ही पक्षांमध्ये बरीच भांडणं लागल्याचे पाहायला मिळत आहे. याबद्दल आता बॉलिवूड निर्माता अशोक पंडित यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्रातील शिवसेना यांच्यात सुरू असलेल्या मतभेदांबद्दल अशोक पंडित यांनी एक ट्विट केले आहे. आपल्या ट्विटर हँडलवरून महाराष्ट्रातील भाजप आणि शिवसेना पक्षांवर रोष व्यक्त करताना ते म्हणाले की, ‘हे दोघे एकत्र काम करतील, असा विचार करून आम्ही आमचे मत भाजप आणि शिवसेना यांच्या युतीला दिले. परंतु ते आपापसांत भांडण करून मतदारांची फसवणूक करीत आहेत.

अशोक पंडित यांनी पुढे लिहिले की, ‘जर अशीच परिस्थिती असेल तर त्यांच्यात वैयक्तिकरित्या निवडणूक लढविण्याचे धैर्य असले पाहिजे. सर्वसामान्यांना या बाबींमध्ये कोणताही रस नाही. मागील अनेक राजकीय घटनांवर निर्माता अशोक पंडित यांनी त्यांची रोखठोक मतं व्यक्त केली आहेत.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x