11 December 2024 6:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Aashiqui 3 | छोट्या पडद्यावरून फेमस झाली जेनिफर विंगेट, आशिका 3 मध्ये कार्तिक आर्यन सोबत स्क्रिन शेअर

Aashiqui 3

Aashiqui 3 | ‘बेहद’ सीरियल मिळे चाहत्यांच्या मनामध्ये घर करणारी जेनिफर विंगेट लवकरच चित्रपटामध्ये झळकणार आहे. दरम्यान, आशिकी आणि आशिकी 2 या सुपरहिट चित्रपटांनंतर दिग्दर्शक अनुराग बासू यांनी ‘आशिकी 3’ घोषणा केली आहे. या चित्रपटामध्ये कार्तिक आर्यन मुख्य भुमिकेमध्ये दिसून येणार आहे तर आर्यनसोबत कोण दिसणार ? याचा खुलासा अजून करण्यात आलेला नाहीये. असे म्हटले जात आहे की या चित्रपटामध्ये कार्तिक सोबत जेनिफर त्याच्या सोबत मुख्य भूमिकेमध्ये दिसून येणार आहे.

आशिकीची ही तिसरी फ्रॅंचायझी
1990 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आशिकी चित्रपट खुप गाजला होता. त्यानंतर 2013 मध्ये आशिकी 2 आला होता. या दोन्ही चित्रपटांमधील गाण्यांची आजही क्रेझ आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग बासू करणार आहेत. पहिल्या आशिकी चित्रपटामध्ये राहुल रॉय आणि अनु अग्रवाल मुख्य भूमिकेमध्ये दिसून आले होते. तर दुसऱ्या आशिकी चित्रपटामध्ये आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेमध्ये दिसून आले होते. दरम्यान, आशिकी 3 च्या मुख्य भूमिकेमध्ये कार्तिक आर्यन असणार आहे पण हिरोईनच्या भूमिकेचे पात्र अध्याप ठरलेले नाही. माध्यमांच्या माहिती नुसार जेनिफर विंगेट आशिकी 3 मध्ये हिरोईनच्या भूमिकेमध्ये दिसून येणार आहे.

जेनिफर विंगेटचे बॉलिवूडमध्ये पदार्पण
छोट्या पडद्यावर उत्तम अभिनयासाठी ओळखली जाणारी जेनिफर विंगेट लवकरच आशिकी 3 चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकते. अध्याप याबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. दरम्यान, उडत असलेल्या अफवांमुळे दिग्दर्शक अनुराग बासू यांनी मौन सोडले आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, अश्या अफवा माझ्या कानावर सुद्धा आल्या आहेत. तथापि, चित्रपटाच्या पहिल्या टप्प्यात आहोत. एकदा कास्टिंग झाले की सर्व गोष्टी समोर येतील.

छोट्यापडद्यावरून फेमस झालेली जेनिफर विंगेट
आत्तापर्यंत आपण जेनिफर विंगेटला छोट्या पडद्यावर काम करताना पाहिले आहे. बेहद, बेपन्ना, आणि सरस्वतीचंद्र सारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये जेनिफर मुख्य भूमिकेमध्ये दिसून आली आहे. बालपणी जेनिफरने आमिर खानच्या अकेले हम अकेले तुम या चित्रपटामध्ये बालकलाकार म्हणून तिच्या कामाची सुरुवात केली होती. यानंतर ती राणी मुखर्जीचा पहिला चित्रपट राजा की आएगी बारातमध्येही दिसून आली होती. ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेमध्ये जेनिफरची मोठी भूमिका होती.

जेनिफर विंगेट टीव्ही सीरियल बेहद आणि बेपन्ना मध्ये दिसली आहे. याशिवाय ती सरस्वतीचंद्र या मालिकेतही दिसली होती. जेनिफरने आमिर खानच्या अकेले हम अकेले तुम या चित्रपटातून बालकलाकार म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर ती राणी मुखर्जीचा पहिला चित्रपट राजा की आएगी बारातमध्येही दिसली होती. ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेत जेनिफरची पहिली मोठी भूमिका होती. याशिवाय ती ओटीटीवरही दिसली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Jennifer Winget to share screen with Karthik Aaryan in Aashiqui 3 Checks details 11 September 2022.

हॅशटॅग्स

Aashiqui 3(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x