Priyanka Chopra in Auto | नो कार नो बाईक! प्रियांका चक्क रिक्षामधून गेली डेटला, निकसोबत शेअर केलेला फोटो व्हायरल
Priyanka Chopra in Auto | अभिनेत्री प्रियांका चोपडाने बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये देखील आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. प्रियांका पती निक आणि मुलगी मालतीसोबत नेहमीच सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करत असते. काही दिवसांपूर्वीच प्रियांका तिच्या कुटुंबासह भारतात परतली आहे. भारतामध्ये मुंबईसह अन्य शहरात रिक्षाने सर्वच जण प्रवास करतात. आता प्रियांकाने देखील निकसोबत रिक्षाने प्रवास केला आहे.
गेल्या शुक्रवारी नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचे ग्रँड ओपनींग झाले. यावेळी सिनेविश्वातील अनेक कलाकारांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी प्रियांका देखील निक जोनससोबत येथे आली होती. प्रियांकाने या इवेंटसाठी जबदस्त गॅमरलस लूक केला होता. रेड कार्पेट ती येताच सर्व कॅमेरे तिच्या दिशेने फिरले. यावेळी निक देखील कमालीचा हँडसम दिसत होता. या कार्यक्रमातील अनेक फोटो या दोघांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अशात या ग्लॅमरस फोटोसह सोशल मीडियावर निक आणि प्रियांकाच्या रिक्षामधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
प्रत्येक व्यक्ती आपल्या स्ट्रगलींग लाईफमध्ये सार्वजनीक वाहनाने प्रवास करतो. अशात मुंबई म्हटल्यावर इथे ट्रेन आणि रिक्षा सर्वत्र पहायला मिळतात. प्रियांकाने रिक्षासोबत निकसह पोज देत काही फोटो काढले आहेत. हे फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “नेहमी माझी साथ देणाऱ्या निकसोबत एक रिक्षा नाईट. प्रियांकाने यावेळी परिधान केलेला हा ड्रेस अमित अग्रवालने डिझाईन केला आहे. त्यामुळे त्यांचे आभार मानत प्रियाकाने लिहिलं आहे की, मला पारंपारीक आणि वेस्टर्न असे दोन्ही लूक एकाच ड्रेसमध्ये पाहिजे होते. पूर्ण आणि पश्चिमेच्या छटा उमटवणारा हा सुंदर ड्रेस दिल्याबद्दल धन्यवाद.
६५ वर्ष जुन्या बनारसी साडीचा ड्रेस
आपल्या ड्रेसविषयी प्रियांकाने पुढे लिहिलं आहे की, “हा सुंदर पोशाख ६५ वर्ष जुन्या विंटेज बनारसी पटोला (ब्रोकेड) साडीचा वापर करून बनवण्यात आला आहे. यामध्ये चांदीचे धागे आणि खादी सिल्कवर सोन्याचे इलेक्ट्रोप्लेटिंग वापरण्यात आले आहे. ब्रोकेडमध्ये सेट केलेले विणकामाचे नऊ रंग दिसण्यासाठी यामध्ये सिक्वेन्स शीट होलोग्राफिक बस्टियर देखील लावण्यात आले आहेत. या ड्रेससाठी अमित तुमचे आणि तुमच्या संपूर्ण टीमचे खूप खूप धन्यवाद.”, असं प्रियांकाने यात म्हटलं आहे.
View this post on Instagram
प्रियांकाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. तसेच कमेंटमध्ये तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे. लवकरच प्रियांका ‘जी ले जरा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. फरहान अख्तरच्या या चित्रपटात ती कॅटरीना आणि आलिया या दोघींसह स्क्रिन शेअर करणार आहे. यासह प्रियांकाची ‘सिटाडेल’ ही वेबसिरीज देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. २८ एप्रिल रोजी अॅमेझॉन प्राईमवर ही वेबसीरिज प्रदर्शित होणार असून प्रियांका याचे प्रमोशन करताना दिसेल.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Priyanka Chopra in Auto date night with Nick Jonas photo viral check details on 03 April 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News
- Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट