24 April 2024 3:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 24 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Communication Share Price | टाटा कम्युनिकेशन्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Waaree Renewables Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 6 महिन्यात 850% परतावा, तर 1 वर्षात 1250% परतावा दिला Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, वेळीच खरेदी करा Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर्सची रेटिंग अपग्रेड, स्टॉक अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल
x

लॉकडाऊनमध्ये दारूची दुकानं सुरू ठेवल्यास विनाशकारी परिणाम भोगावे लागतील

Javed Akhtar, Liquor Shops, Lockdown, Corona Crisis

मुंबई, २ मे: केंद्र सरकारने लॉकडाऊनचा कालावधी २ आठवड्यांसाठी वाढवला असून तो १७ मेपर्यंत करण्यात आला आहे. यासाठी सरकारने काही नवीन नियमावली तयार केली आहे. यामध्ये दारूविक्रिला काही प्रमाणात परवानगी देण्यात आली आहे. रेज झोन आणि ग्रीन झोनमध्ये दारूची दुकानं आणि पानाची दुकानं सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. रेड झोनच्या आणि हॉटस्पॉटच्या बाहेर असणाऱ्या दुकानांना परवानगी देण्यात येणार आहे.

यावर ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ट्विट करून त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. लॉकडाऊनच्या काळात दारूची दुकानं सुरू ठेवली तर त्याचे विनाशकारी परिणाम भोगावे लागतील. तसेच दारूमुळे कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरण वाढली आहेत. लहान मुलं आणि महिलांसाठी हा निर्णय त्रासदायक ठरू शकतो असं मत या ट्विटमधून मांडलं आहे.

दारुविक्री केवळ १६ ऑरेंज झोन आणि ६ ग्रीन झोनमध्येच करता येणार आहे. १४ रेड झोनमध्ये दारुविक्री करता येणार नाही. त्यामुळे रेड झोनमधील दारु शौकिनांना दारुची प्रतीक्षा करावी लागणार आहे. दारु, पान, तंबाखू, गुटखा यांची विक्री सुरु झाली तरी ग्राहकांना दुकानावर गर्दी करता येणार नाही.

तत्पूर्वी, ‘राज्याची आर्थिक परिस्थिती सध्या बिकट आहे. कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाहीत. त्यामुळं महसुलाचा ओघ सुरू करण्याचा विचार आता सरकारनं करायला हवा. वाईन शॉप्स सुरू ठेवून त्याची तजवीज करता येऊ शकते. त्यामुळं कुठल्याही नैतिक गुंत्यात न अडकता राज्य सरकारनं तसा निर्णय घ्यावा,’ अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. ‘दारू पिणाऱ्यांचा विचार करा असा माझ्या म्हणण्याचा उद्देश नाही, हेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केलं होतं.

‘महाराष्ट्राचं रूतलेलं अर्थचक्र बाहेर काढावंच लागेल, अर्थव्यवस्थेसाठी काही निर्णय घ्यावेच लागतील. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझं जाहीर आवाहन…’, असं लिहित ठाकरे यांनी ट्विट करत या आवाहनपर पत्राची प्रत जोडली होती. त्यात त्यांनी दारूच्या उत्पादन व विक्रीच्या माध्यमातून मिळणाऱ्या महसुलाकडं सरकारचं लक्ष वेधलं होतं. दारूवरच्या अबकारी शुल्कातून राज्याला दिवसाला ४१.६६ कोटी, महिन्याला १२५० कोटी आणि वर्षाला १५००० कोटी मिळतात. यावरून सरकारला होत असलेल्या व होऊ शकणाऱ्या महसुली तोट्याचा विचार व्हायला हवा. टाळेबंदी आणखी किती दिवस चालेल याची खात्री नाही. त्यामुळं राज्याच्या महसुलासाठी सरकारनं वाइन शॉप उघडण्याचा विचार करावा, असं त्यांनी पत्रात म्हटलं होतं.

 

News English Summary: If the liquor store continues during the lockdown, it will have devastating consequences. Alcohol has also increased the incidence of domestic violence. This tweet suggests that this decision can be troublesome for children and women.

News English Title: Story Bollywood celebrity Javed Akhtar opening liquor shops during lockdown will only bring disastrous results News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x