12 December 2024 2:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Hair Serum Benefits | कोरडे केस अथवा गळतीची समस्या, हेअर सीरमच्या वापरासंबंधित या टिप्स फॉलो करा

Hair Serum Benefits

Hair Serum Benefits | अनेकदा आपण पाहतो की, महिला केसांच्या वाढी साठी अनेक प्रयोग करत असतात. सोशल मीडियावर स्किन, हेअर याबाबत टीप्स पेजेस महिला फॉलो करतात. तुम्ही हेअर सीरम हा प्रकार पाहिला किंवा ऐकला असेल तर हेअर सीरम सिलिकॉनवर आधारित एक द्रव आहे, जे तुमच्या केसांचे संरक्षण करते. प्रदूषणापासूनच नाही तर उष्णतेपासूनही हेअर सीरम केसांचे संरक्षण करते. तुमचे केस कोरडे अथवा गळतीची समस्या असल्यास हेअर सीरमच्या वापराने ते दूर होते. याशिवाय सीरम केसांच्या मुळांना पोषण देते, त्यामुळे हेअर सीरमचे एक-दोन नव्हे तर अनेक फायदे आहेत, तर चला आजच्या लेखामध्ये त्याबद्दल जाणून घेऊया.

अशाप्रकारे हेअर सीरम वापरा
केस धुतल्यानंतर किंवा केसांना शायनिंग येण्यासाठी वापरण्याच्या उत्पादनापूर्वी हेअर सीरम लागू केले जाते. लक्षात ठेवा सीरम टाळूवर लावला जात नाही पण केसांच्या लांबीवर लावला जातो.

1. केस दाट बनवते
हेअर सीरमचा सतत वापर केल्याने केस दाट होतात आणि त्यामुळे जर तुमचे केस खूप पातळ किंवा खराब झाले असतील तर केसांचे सीरम त्याला दुरुस्त करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

2. खराब झालेले केस दुरुस्त करते
हेअर सीरम वापरल्याने केसांची वाढ लवकर होतेच पण ते खराब झालेले केस दुरुस्त करण्याचेही काम करते. खरं तर, हेअर सीरम केसांवर एक थर जमवते जे आपल्या केसांचे संरक्षण करण्यास मदत करते आणि केसांना कोरडे व निर्जीव बनवणाऱ्या गोष्टींपासून रक्षण करते.

3. केसांची चमक वाढवते
हेअर सीरम मुळे केसांना चमक येते. तसेच कोरडे, निर्जीव आणि कुजलेले केस देखील निरोगी बनवण्याचे काम करते. हेअर सीरम लावल्याने कुरळे केस विलग करण्यास मदत होते.

4. सूर्यप्रकाश आणि प्रदूषणापासून संरक्षण करते
सूर्यप्रकाश, धूळ आणि प्रदूषण केवळ आपल्या त्वचेसाठीच नाही तर केसांसाठीही हानिकारक असतात. काही प्रकारच्या केसांच्या सीरममध्ये असे घटक असतात जे केसांना सूर्याच्या हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून वाचवत असतात आणि त्यामुळे केसांशी संबंधित अनेक समस्या दूर राहतात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Hair Serum Benefits Tips Checks details 26 September 2022

हॅशटॅग्स

Hair Serum Benefits(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x