20 April 2024 3:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

Winter Skin Care | थंडीत त्वचा आकसते आणि चेहरा काळा पडतो, या होममेड फेसपॅकने चेहरा सुदर ठेवा

Winter Skin Care

Winter Skin Care | हिवाळ्याचे दिवस सुरु आहेत. अशात सध्या अनेक जण थंडीपासून आपल्या त्वचेचा बचाव करण्याचे उपाय शोधत असतात. थंडी वाढली की आपल्या चेह-यावर सुरकुत्या येतात. काहींची स्कीन सेंसेटीव असल्याने त्यांना तर भेगा देखील पडतात. त्यामुळे खुप त्रासही होतो आणि आपली सुंदरता कमी होतो. यासाठी अनेक मुली आपल्या चेह-याला कोल्ड क्रिम लावतात. मात्र आज आम्ही तुम्हाला काही स्वस्त आणि घरातीलच काही सामग्रीतून तयार होणारे फेसपॅक सांगणार आहोत. हे फेसपॅक तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा वापरू शकता. यामुळे त्वचा कोरडी पडत नाही, तसेच तुमचा चेहरा अधीक उजळून येतो.

हे फेस पॅक वापरल्याने चेह-यावर कोणतेही पिंपल देखील येत नाहीत. कारण ते होममेड असतात. थंडीत त्वचा आकसते त्यामुळे चेहरा काळा सुध्दा पडतो. तर या फेसपॅकने तुमच्या काळवंडलेला चेहरा देखील उजळून निघतो. तर हे फेसपॅक कोणते आहेत आणि तुम्ही ते कसे बनवायचे या विषयी जाणून घेऊ.

दही, टोमॅटो आणि बेसन
टोमॅटो शरीरासाठी आणि त्वचेसाठी खुप गुणकारी आहे. तसेच त्यात व्हिटॅमीन सी असते. ऍण्टीऑक्सीडंटचे प्रमाणही यात जास्त आहे. त्यामुळे एक टोमॅटो घ्या. तो थोडा बारीक किसा आणि त्यात असलेला सर्व रस काढून घ्या. त्यात एक चमचा दही आणि एक चमचा बेसन मिसळा. हे मिश्रण तुम्ही २५ ते ३० मिनटे चेह-यावर ठेवू शकता. त्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा आणि त्यावर थोजे मॉश्चराइजर अप्लाय करा.

मसुरडाळ आणि काकडी
एक काकडी बारीक किसून घ्या. तसेच मसुरडाळीचे मउ पिठ घ्या. यातील २ चमचे पिठ आणि काकडीचा किस एकत्र मिक्स करा. त्यानंतर हे मिश्रण देखील २० मिनीटे चेह-यावर लावून ठेवा. चेहरा सुकत आला की सर्व सुके असतानाच काढून घ्या. नंतर चेहरा धुवा.

मध आणि लिंबू
तुमचा चेहरा थंडीमुळे काळपट पडला असेल तर हा फेसपॅक खुप उपयुक्त आहे. एक चमचा मध घेउन त्यात चमचा भर लिंबाचा रस मिसळवा. नंतर ते चेह-यावर लावा. २० मिनटे हे मिश्रण चेह-यावर तसेच ठेवा. त्यानंतर थोडे मसाज करत ते धुवून टाका. तुमच्या चेहऱ्यात झालेला बदल तुम्हाला लगेच जाणवेल. हे तीन फेसपॅक या थंडीत तुमच्या चेह-याचे संरक्षण करतील. त्यामुळे यांचा वापर नक्की करुण पाहा.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Winter Skin Care These three face packs will protect your face from cold 05 November 2022.

हॅशटॅग्स

Winter Skin Care(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x