13 December 2024 4:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाच्या 'या' योजनेत SIP करा, खात्यात 1.31 कोटी रुपये जमा होतील EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम
x

iQOO 11 5G Smartphone | IQOO 11 5G स्मार्टफोन लाँच होण्यास सज्ज, किंमत-फीचर्स आणि बरंच काही हटके

iQOO 11 5G Smartphone

iQOO 11 5G Smartphone | चीनची मोबाइल उत्पादक कंपनी आयक्यूओओने आपल्या आयक्यूओ ११ सीरीजचा लेटेस्ट 5G कनेक्टिविटी स्मार्टफोन लाँच करण्याची घोषणा केली आहे. कंपनी आपला नवा आयक्यूओ ११ 5G फोन ८ डिसेंबरला बाजारात सादर करणार आहे. याआधी आयक्यूओ आपला फोन 2 डिसेंबरला लाँच करणार होता, मात्र चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष जियांग झेमिन यांच्या निधनानंतर कंपनीने नव्या फोनचा लाँचिंग प्रोग्राम रद्द केला. इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आयक्यूओओने या नव्या फोनच्या लाँचिंगबाबत माहिती दिली आहे.

फीचर्स
आयक्यूओ कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आयक्यूओ 11 5 जी स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा लेटेस्ट स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 प्रोसेसर, एलपीडीडीआर 5 एक्स रॅम आणि यूएफएस 4.0 स्टोरेज असणार आहे. कंपनी या नव्या हँडसेटचे दोन व्हेरिएंट बाजारात सादर करेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यात २५६ जीबी आणि ५१२ जीबी स्टोरेज असेल. आयक्यूओओ ११ ५ जी स्मार्टफोन ८ जीबी आणि १२ जीबी रॅमसह ऑफर केला जाऊ शकतो. आयक्यूओ ११ ५ जी फोनमध्ये ई६ एमोलेड डिस्प्ले मिळू शकतो. या डिस्प्लेचे रिझोल्युशन २ के आणि रिफ्रेश रेट १४४ हर्ट्ज असू शकतात.

iQOO Neo 7 SE देखील लाँच होणार
अशी अपेक्षा आहे की लेटेस्ट फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि १३ मेगापिक्सलचा टेलिफोटो युनिटसह ट्रिपल रियर सेटअप मिळेल. तसेच यामध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असू शकतो. फोनमध्ये ५ हजार एमएएचची बॅटरी मिळू शकते आणि चार्ज करण्यासाठी १२० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टही मिळू शकतो. कंपनीला आयक्यूओओ नियो ७ एसई या आणखी एका नवीन फोनमध्ये एएमओएलईड डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज असू शकतो आणि फोनमध्ये १२ जीबीपर्यंत रॅम मिळू शकते. तसेच, या फोनमध्ये मीडियाटेकच्या डायमेनसिटी चिपसेटसह कंपनी येण्याची पुष्टी झाली आहे. अशी अपेक्षा आहे की आयक्यूओयू आपल्या आयक्यूओओ ११ 5G सह आयक्यूओओ निओ ७ एसई फोन देखील लाँच करू शकते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: iQOO 11 5G Smartphone will launch soon on 08 December check details on 04 December 2022.

हॅशटॅग्स

#iQOO 11 5G Smartphone(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x