25 April 2024 5:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

बापरे | आरोग्य सेतू अ‍ॅप कुणी बनवलं ते मोदी सरकारला माहित नाही | डेटा कोणाकडे?

Modi government, Arogya Setu App, RTI reply

नवी दिल्ली, २८ ऑक्टोबर : कोरोनाचा प्रसार वेगाने सुरु झाल्यापासून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं केंद्र सरकारकडून तयार करण्यात आलेल्या आरोग्य सेतू अ‍ॅपचा वापर करण्याचं आवाहन केलं जात आहे. प्रवासासह अनेक ठिकाणी हे अ‍ॅप सक्तीचं करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे बॉलीवूडच्या मोठ्या अभिनेत्याने त्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने जाहिरात करून मोठा खर्च देखील केला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनंही या अ‍ॅपचं कौतुक केलं आहे. मात्र, या अ‍ॅपबद्दल केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, राष्ट्रीय माहिती केंद्र (National informatics centre) यांनी हे अ‍ॅप कुणी तयार केलं याविषयी काहीही माहिती नसल्याचं उत्तर दिलं आहे. माहिती अधिकारात विचारण्यात आलेल्या माहितीवर हे अजब उत्तर देण्यात आलं असून, केंद्रीय माहिती आयोगानं यावरून फैलावर घेतलं आहे. मे महिन्यातच हे सेतू अ‍ॅप १०० मिलियन ग्राहकांनी डाउनलोड केलं आहे. याबाबत स्वतः आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली होती.

लाईव्ह लॉ’ने हे वृत्त दिलं आहे. केंद्रीय माहिती आयोगाने (CIC) मंगळवारी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातील केंद्रीय सार्वजनिक माहिती अधिकारी (CPIO), राष्ट्रीय माहिती केंद्र (NIC) व NeGD यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आरटीयच्या अधिनियमांनुसार कलम २० अंतर्गत गुन्हा का दाखल केला जावू नये? असा सवाल केला आहे. या सर्वांवर आरोग्य सेतु अ‍ॅप संबंधित आरटीआयला प्रतिसाद आणि उत्तर न दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरटीआयमध्ये मिळालेलं धक्कादायक अधिकृत उत्तर तुम्ही येथे वाचू शकता.

आरोग्य सेतूच्या वेबसाइटवर हे अ‍ॅप एनआयसीच्या प्लॅटफॉर्मवर डिझाईन, डेव्हलप आणि होस्ट करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, एनआयसीला यासंदर्भात माहिती कशी नाही असा सवाल केंद्रीय माहिती आयोगानं केला आहे. केंद्रीय माहिती आयोगाचे मुख्य आयुक्त एन. सरण यांनी यासंदर्भात लेखी उत्तर मागितले आहे. तसेच त्यांच्याकडे काही माहिती नसल्यास https://aarogyasetu.gov.in/ ही वेबसाइट gov.in या नावाने वेबसाइट कशी तयार केली गेली,” असा सवाल करत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं.

कोणत्याही केंद्रीय सार्वजनिक माहिती अधिकाऱ्याने हे अ‍ॅप कोणी तयार केले, फाइल्स कोठे आहेत याबद्दल माहिती दिलेली नाही. लाईव्ह लॉने दिलेल्या वृत्तानुसार केंद्रीय माहिती आयोगाने सौरव दास यांच्या तक्रारीनंतर हे आदेश दिले आहेत. “या प्रकरणात एनआयसी, नॅशनल ई-गव्हर्नन्स विभाग (एनजीडी) आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने आरोग्य सेतु अ‍ॅप आणि त्याच्या निर्मितीशी संबंधित अन्य प्रक्रियेबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. अ‍ॅप तयार करण्याबाबत एनआयसीकडे माहिती नाही असे याचिकेत सांगण्यात आले आहे,” असे एन. सरण यांनी सांगितले. “जर तुम्ही हे अ‍ॅप बनवले असेल, तर हे उत्तर आश्चर्यकारक आहे,” अशा शब्दात सरण यांनी कानउघडणी केली आहे.

 

News English Summary: The Central Information Commission on Tuesday issued show-cause notices to the CPIOs, Ministry of Electronic, National Informatics Centre,NeGD as to why penalty u/s 20 of the RTI Act should not be imposed on them for prima facie obstruction of information and providing an evasive reply on an RTI application related to Arogya Setu App. CIC also asked NIC to explain that when in the Aarogya Setu website it is mentioned that the platform was designed, developed and hosted by it, then how is it that they do not have any information about creation of the App.

News English Title: Modi government do not know who made Arogya Setu App reply to RTI Application News Updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x