कसलं बॉयकॉट चायना | Xiaomi'ने ३ महिन्यात 1.35 कोटी स्मार्टफोन्स विकले
नवी दिल्ली, ७ नोव्हेंबर: देशातील सामान्य लोकांचं आणि तरुणाईचं मोबाईल वेड खूप मोठं असून त्यासाठी भारतीय खूप पैसा खर्च करत असतात. काही महिन्यांपूर्वी पारंपरिक शत्रू राष्ट्र असलेल्या चीन सोबत भारताचे संबंध अत्यंत टोकाला जाऊन युद्धाच्या धमक्यांवर जाऊन पोहोचले होते.
त्यानंतर भारतीयांनी देखील समाज माध्यमांवर बॉयकॉट चायनाचा नारा दिला होता. मात्र त्यानंतर दिसून आलेल्या देशभक्ती चायनीस मोबाईल प्रेमापुढे कुचकामी ठरली आहे. कारण भारतात चिनी कंपन्या मागील काही दिवसांपासून त्यांच्या मोबाईलची रेकॉर्डब्रेक विक्री करत आहेत. चिनी मोबाईल कंपनी शाओमी इंडियाने (Xiaomi India) मागील ३ महिन्यांत देशभरातील मोठं मार्केट काबीज केलं आहे.
ग्लोबल रिसर्च फर्म इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशनच्या (IDC Report) रिपोर्टनुसार यावर्षीच्या तिसऱ्या तिमाहित भारतात तब्बल ५.४३ कोटी स्मार्टफोन्सची विक्री झाली आहे. या रिपोर्टचा विचार केला तर दरवर्षीच्या तुलनेत भारतातील मोबाईल विक्रीत तब्बल १७ टक्क्यांची एवढी प्रचंड वाढ झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला चीन आणि अमेरिकेत मात्र मोबाईलच्या विक्रीत मोठी घट झाली आहे.
रिपोर्टमधील माहितीनुसार भारतात विक्री करणाऱ्या मोबाईल कंपन्यांमध्ये Xiaomi कंपनी सर्वात वर आहे. यावर्षीच्या तिसऱ्या तिमाहित शाओमीने भारतात 13.5 मिलियन (1.35 कोटी) मोबाईल्सची विक्री केली आहे. शाओमीच्या Redmi 8A Dual, Redmi 8 आणि Redmi Note 9 या मोबाईल्सना भारतीय ग्राहकांनी सर्वाधिक पसंती दर्शवली आहे. या तिमाहित शाओमीचा सब ब्रॅण्ड Poco च्या 10 लाख स्मार्टफोन्सची विक्री झाली आहे. भारतातील ऑनलाईन मार्केटमध्ये एकट्या शाओमीचा तब्बल 35 टक्के वाटा आहे.
News English Summary: In India, Chinese companies have been selling record-breaking mobile phones for the past few days. Chinese mobile company Xiaomi India has captured a large market across the country in the last three months. According to a report by global research firm International Data Corporation (IDC Report), India sold 5.43 crore smartphones in the third quarter of this year. According to the report, mobile sales in India have grown by a whopping 17 per cent year-on-year. On the other hand, mobile sales in China and the United States have fallen sharply.
News English Title: Xiaomi smartphone captured Indian market now Samsung becomes second News Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News