13 December 2024 7:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA
x

Health First | सब्जा बिया खाण्याचे 'हे' आहेत आरोग्यदायी फायदे

Basil seeds amazing health benefits of eating Sabja seeds news updates

मुंबई, २७ मार्च: तुळशीचं बी म्हणजेच सब्जा आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. सब्जामध्ये प्रथिनं, कर्बोदके, अ, क, ई, ब, जीवनसत्व असतात, त्याचप्रमाणे मॅग्नेशियम, फायबर, कॅल्शियम आणि पोटॅशियम असतं. वारंवार होणाऱ्या अ‍ॅसिडिटी, अपचनाच्या त्रासावर सब्जा फायदेशीर आहे यामुळे वजन नियंत्रणात राहतं, पचनशक्ती सुधारते पण त्याचबरोबर त्वचेसाठी आणि केसांसाठीही सब्जा फायदेशीर आहे.

तुळस ही भारतीय घरात आढळणारी एक पूजनीय वनस्पती आहे. प्रत्येक बहुतेक घरात एक तुळशीचे रोप तुम्हाला आढळेलच. तुळस स्वतःमध्ये औषधी गुणधर्मांनी संपूर्ण होते. तुळशीची वनस्पती, तुळशीची बियाणे आणि तुळशीची पानेही बर्‍याच रोगांच्या उपचारांमध्ये उपयुक्त आहेत. सब्जा बिया तुळशी प्रजातीच्या वनस्पतीपासून मिळते. याला सब्जा बीज किंवा गोड तुळस असेही म्हणतात.तुळशीची पाने बर्‍याच रोगांच्या उपचारांमध्ये वापरली जातात, तर तुळशीचे बियाणे बर्‍याच रोगांसाठी आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी देखील वापरले जातात. प्रोटीन, जीवनसत्त्वे, फायबर ओमेगा आणि फॅटी सिडस् सारख्या सब्जा बियाण्यामध्ये पौष्टिक घटक आढळतात जे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानल्या जातात.

अ‍ॅसिडीटवर फायदेशीर:
सब्जा हा थंड असतो. त्यामुळे तुम्हाला वारंवार अ‍ॅसिडिटीचा त्रास होत असल्यास सब्जाच्या बिया पाण्यात भिजवून ठेवा आणि हे पाणी प्या यामुळे अ‍ॅसिडिटीचा त्रास कमी होतो.

टाइप १ आणि टाइप २ मधुमेहाचा त्रास कमी:
सब्जामुळे टाइप १ आणि टाइप २ मधुमेहाचा त्रास कमी होतो. जेवणापूर्वी सब्जा घ्या यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

वजन कमी करण्यामध्ये फायदेशीर:
जर आपण लठ्ठपणाने त्रासले असाल तर सब्जा बियाणे आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते. सब्जा बियाणे लठ्ठपणा कमी करण्यासाठी वापरतात. याच्या सेवनाने आपले पोट ही भरते आणि आपल्याला भूक ही कमी लागते . ज्यामुळे हे वजन नियंत्रित करण्यात मदत करते. या बियांमध्ये फायबर आढळते जे चरबी जाळण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.

पोटांच्या विकारांसाठी फायदेशीर:
सब्जच्या बिया थंड असतात . त्याचा वापर केल्याने तुमचे पोटात नेहमी थंडावा राहतो . पोट गॅसच्या समस्येमध्ये सब्जा चे सेवन करणे फायदेशीर आहे. एक कप दुधासह एक चमचा सब्जा बिया घ्या. यामुळे पोटात जळजळ, अपचन आणि एसिडिटी या समस्यांपासून मुक्तता मिळू शकते.

चांगल्या त्वचेसाठी फायदेशीर:
तुळशीची पाने अनेक आजारांपासून बचाव करण्याचे काम करते. आपण हे ऐकले असेलच, परंतु त्वचेला सुंदर बनविण्यासाठी त्याची बियाणे अधिक फायदेशीर ठरते. कारण त्यात प्रथिने आणि ऑरयन भरपूर प्रमाणात आढळतात.

कसे वापरावे:
सर्व प्रथम, नारळ तेल आणि सब्जा बियांची पावडर मिक्स करा. नंतर हे मिश्रण त्वचेवर लावा. हे मिश्रण त्वचा इंफेक्शन आणि सोरायसिस रोगांमध्ये फायदेशीर ठरू शकते.

रक्तातील साखरेची पातळी नियमित करते:
मधुमेहाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला गोड पदार्थ खाण्यास मनाई आहे हे आपल्याला महित आहे परंतु साखर असताना त्यांना अधिक गोड खाण्याची इच्छा असते.परंतु,संशोधनानुसार, रक्तातील साखरेची पातळी कमी करून मधुमेहाच्या 2 प्रकारच्या उपचारांमध्ये फायदेशीर ठरते. दररोज रात्री या बिया एक चमचे भिजवा, एका ग्लास दुधात मिसळा आणि दुसर्‍या दिवशी न्याहारीसाठी खा

 

News English Summary: Basil seeds are very good for health. Vegetables contain proteins, carbohydrates, vitamins A, C, E, B, as well as magnesium, fiber, calcium and potassium. Frequent acidity, indigestion, sabza is beneficial for weight control, improves digestion, but also beneficial for the skin and hair.

News English Title: Basil seeds amazing health benefits of eating Sabja seeds news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x