25 April 2024 3:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार? Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्स खरेदीला गर्दी, अवघ्या 4 वर्षात 1 लाख रुपयांवर दिला 21 लाख रुपये परतावा Amara Raja Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर खरेदी करा, अवघ्या 5 दिवसात दिला 33 टक्के परतावा Reliance Home Finance Share Price | 3 रुपयाचा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, अवघ्या 2 दिवसात 10% परतावा, खरेदीला गर्दी
x

२ जानेवारीला होणार कोरोना लसीकरणाचा ड्राय रन | या ४ जिल्ह्यांची निवड

Dry run, Corona vaccination, Maharashtra, health minister Rajesh Tope

मुंबई, ०१ जानेवारी : कोरोना लसीच्या पुरवठ्यासाठी चार राज्यांमध्ये ड्राय रनचे यशस्वी आयोजन केल्यानंतर केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. चार राज्यानंतर देशातील सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये ड्राय रनचं आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारनं यापूर्वी कोरोना लसीचे ‘ड्राय रन’ चे आयोजन 28 आणि 29 डिसेंबर रोजी केले होते. पंजाब, आसाम, आंध्र प्रदेश आणि गुजरात या चार राज्यांमध्ये ड्राय रन आयोजित करण्यात आली होती.

त्यानंतर कोरोना लसीकरणाचा ड्राय रन देशभर २ जानेवारी रोजी होणार असून त्यासाठी महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज याबाबत घेतलेल्या व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लसीकरणासाठी कशाप्रकारे तयारी करायची याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

दरम्यान, ड्राय रनसाठी एकाच जिल्ह्यातील तीन साईट (आरोग्य केंद्र) निवडण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील पुणे येथील जिल्हा रुग्णालय औंध, प्राथमिक आरोग्य केंद्र मान, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील जिजामाता रुग्णालय, नागपूर जिल्ह्यातील डागा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय कामटी, नागपूर महापालिकेचे शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, जालना येथील जिल्हा रुग्णालय जालना, उप जिल्हा रुग्णालय अंबड, बदनापूर तालुक्यातील शेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नंदूरबार येथील जिल्हा रुग्णालय नंदूरबार, प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टे आणि नवापूर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी लसीकरणाचा ड्राय रन होणार आहे.

कोणतीही लस लोकांना देण्यापूर्वी तिची ‘ड्राय रन’ घेतली जाते. या दरम्यान जर या लसीमध्ये काही समस्या किंवा त्रुटी आढळल्यास, नंतर त्यात सुधारणा केली जाऊ शकते. प्रत्यक्ष लसीकरणाप्रमाणेच ‘ड्राय रन’ची प्रक्रिया केली जाते. तथापि, या ड्राय रन दरम्यान लोकांना लसीचा डोस दिला जात नाही. केवळ त्या लोकांचा डेटा अपलोड केला जातो. मायक्रो प्लॅनिंग, सेशन साइट मॅनेजमेंट आणि ऑनलाइन डेटा सिक्युरिटी यासारख्या गोष्टींच्या चाचण्या घेतल्या जातात.

 

News English Summary: The dry run of corona vaccination will be held across the country on January 2, for which four districts of Maharashtra namely Pune, Nagpur, Jalna and Nandurbar have been selected. Health Minister Rajesh Tope said that the Union Ministry of Health has given guidance on how to prepare for vaccination through video conferencing.

News English Title: Dry run before corona vaccination will start in Maharashtra says health minister Rajesh Tope news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x