Health First | पॉपकॉर्न खाणे आहे आरोग्यासाठी फायदेशीर । नक्की वाचा

मुंबई १० एप्रिल : सिनेमा पाहताना पॉर्पकॉर्न खाण्याची सवय अनेकांना असते. आजकाल पॉपकॉर्न अनेक फ्लेवर्समध्ये उपलब्ध असतात. अवेळी लागणार्या भूकेवर मात करण्यासाठी पॉर्पकॉर्न हा उत्तम पर्याय आहे. वजन घटवणार्यांच्या आहारात हमखास पॉपकॉर्नचा समावेश केला जातो. पण पॉपकॉर्न खाण्याचे इतरही काही फायदे आहेत.
लहान असोत की मोठे… पॉपकॉर्न सगळ्यांनाच आवडतात. आपण चित्रपट बघत असताना किंवा बागेत फिरताना हातात बहुतेकदा पॉपकॉर्नचे पाकीट असते. लॉकडाऊनच्या काळातही अनेकांच्या जवळ पॉपकॉर्नचे भांडे होते. असेही पॉपकॉर्न खाणे चांगले असते. यात अनेक पोषक घटक असतात जे हृदय आणि पोटासाठी चांगले असतात. साध्या पॉपकॉर्नमध्ये फायबर, पॉलिफेनिक घटक, अॅन्टीऑक्सिडंट घटक, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, मॅग्नीज घटक मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे पॉर्पकॉर्नची चव नक्की चाखा.
जाणून घ्या पॉपकॉर्न खाण्याचे खास फायदे
1. पॉपकॉर्न आपल्या शरीरातील कॉलेस्टॉल कमी करतात: पॉपकॉर्नमध्ये तंतूमय पदार्थ मुबलक प्रमाणात असतात, जे आपल्या शरीरातील कॉलेस्टॉल कमी करतात. यामुळे आपल्याला हार्ट अॅटॅकसारखा गंभीर आजार होण्याची शक्यता कमी होते.
2. पचनसंस्था चांगली राहते: पॉपकॉर्न एका प्रकारे मक्याचा पूर्ण दाणाच असतो, ज्यात त्याची सगळी तत्वे असतात, ज्यात कोंडाही असतो. तो खाल्ल्याने आपली पचनसंस्था चांगली राहते आणि अनेक समस्या दूर राहतात.
3. पॉपकॉर्न आपल्याला कॅन्सरपासून वाचवू शकतात: पॉपकॉर्नमध्ये पॉलिफिनॉलिक कंपाऊंड्स असतात, जे शक्तिशाली अॅंटी-ऑक्सिडंट्स मानले जातात आणि हे अॅंटी-ऑक्सिडंट्स आपल्या शरीरात कॅन्सर उत्पन्न होण्यापासून रोखतात.
4. त्वचाही राहते चांगली: पॉपकॉर्न खाल्लाने आपली त्वचाही चांगली राहते. यामुळे सुरकुत्या, एज स्पॉट, अंधत्व, मांसपेशींमध्ये कमजोरी, केस गळणे अशा समस्या दूर राहतात आणि आपण कायम तरूण दिसाल.
5. जाडेपणा कमी करा: पॉपकॉर्नमध्ये जास्त कॅलरी नसतात, त्यामुळे भूक लागल्यावर आपण जास्त पॉपकॉर्न खाल्ले तरी आपल्याला जास्त कॅलरी मिळणार नाहीत आणि आपले वजन वाढणार नाही.
6. हाडे मजबूत करा: पॉपकॉर्नमध्ये मँगनीज मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे आपली हाडे कायम मजबूत राहतात.
7. लोहाची कमतरता भरून काढा: एका संशोधनानुसार कळले आहे की 28 ग्रॅम पॉपकॉर्नमध्ये जवळपास 0.9 मिलिग्रॅम लोहाची मात्रा असते. यामुळे पॉपकॉर्न खाल्ल्यास आपल्या शरीरात लोहाची कमतरता राहणार नाही.
8. मधुमेहासाठी चांगले असतात पॉपकॉर्न: ज्यांना मधुमेहाची समस्या असते, त्यांच्यासाठी पॉपकॉर्न फार चांगले असतात. यात तंतूमय पदार्थ मुबलक प्रमाणात असतात, जे रक्तातील साखर आणि इन्सुलिन नियंत्रणात ठेवतात. यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना पॉपकॉर्न खाण्याचा सल्ला दिला जातो.
News English Summary: Many people have a habit of eating popcorn while watching movies. Nowadays popcorn is available in many flavors. Porcorn is a great alternative to quench your hunger. Weight loss will be followed by fatigue and constant tiredness. But there are other benefits to eating popcorn
News English Title: Eating popcorn is beneficiary to our health news update article
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर रेल्वे स्टॉक मालामाल करणार, शॉर्ट टर्म अपसाईड टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC