19 April 2024 6:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

Health First | सीताफळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे माहिती आहेत? - नक्की वाचा

Health benefits of custard apple

मुंबई, २७ जुलै | आपल्या रोजच्या आहारात आपण सीताफळ खाणे आपल्याला खूप फायद्याचे आहे.आपल्या आरोग्यासाठी सीताफळ खाणे खूप चांगले असते जे की सीताफळ हे फळ खाण्यास सुद्धा खूप चविष्टदार असते आपल्याला जर पित्त, वात, रक्तदाब तसेच हृदयासाठी खूप पोषक आहे. आपल्याला जो वात येतो तो घालवण्यासाठी सीताफळ हे फळ खूप फायद्याचे असते तसेच कमी होण्यास सुद्धा मदत होते.

केसांसाठी फायदेशीर:
अगदी लहान मुलांचे केस सुद्धा पांढरे व्हायला लागले आहेत आणि आपण तेच केस कलर करण्यासाठी वेगवेगळ्या केमिकल्स चा वापर करतो पण त्याच ऐवजी जर तुम्ही केमिकल्स चा वापर न करता जर आहारात सीताफळाचा वापर केला तर तुमचे केस गळणे तसेच केस पांढरे सुद्धा होऊ शकत नाहीत पण त्यासाठी तुम्हाला सीताफळ खावावे लागेल. धावपळीच्या जीवनात आपल्या केसांवर आपले लक्ष नाही त्यामुळे केसांना होणाऱ्या इजा जसे की केस पांढरे पडणे तसेच केस गळणे व टक्कल होणे इ. परिस्थितीना सामोरे जावे लागत आहे. तुमचे जर जास्त प्रमाणात केस गळत असतील तर तुम्ही एक उपाय करा तो म्हणजे सीताफळाच्या बिया घ्या आणि त्या बिया बकरीच्या दुधामध्ये उगाळून लावा असे केल्याने तुमचे केस गळणे बंद होईलच पण त्याच प्रमाणे तुमच्या डोक्यावर नवीन केस सुद्धा येण्यास सुरू होईल.

चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होणे:
धावपळीच्या जीवनात खूप लोकांच्या अशा तक्रारी येत आहेत की चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यासाठी कोणते उपाय करावेत जे की आपण पिंपल्स घालवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकल्स चा वापर करतो पण तरीही त्याचा काही उपयोग होत नाही. तुम्हाला जर तुमचा चेहऱ्यावरील पिंपल्स घालवायचे असतील तर तुम्ही सीताफळाच्या पानांचा लेप चेहऱ्यावर लावा यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स चे प्रमाण कमी होईल.

ब्लडप्रेशर पासून सुटका:
कोणत्या न कोणत्या ताण तणावामुळे लोकांना ब्लडप्रेशर ची समस्या उदभवायला सुरू होते, आपण कोणत्याही गोष्टीला घाबरलो की आपला ब्लडप्रेशर हाय किंवा लो होतो. तुम्ही जर रोज एक सीताफळ खाल्ले तर ब्लडप्रेशर पासून तुमची सुटका होऊ शकते.

अशक्तपणा दूर होणे:
जेव्हा आपण आजारी पडतो त्यावेळी आपल्याला अशक्तपणा येण्यास सूरी होते किंवा कोणतेही काम केले तर आपल्याला थकवा सुद्धा यायला सुरू होते पण आपण जर सीताफळ खाल्ले तर आपल्या शरीरात पुरेशी ऊर्जा तयार होते आणि आपली अशक्तपणा पासून सुटका होते.

* अतिसार झाला असेल तर सीताफळाचा रस फायदेशीर असतो.

* छातीत, पोटात जळजळ जाणवत असेल तर सीताफळ खाल्ल्यानं आराम पडतो.

* लहान मुलांच्या वाढीसाठीही सीताफळ अधिक फायदेशीर आहे.

* ज्या लोकांना कोणत्याही गोष्टीची मनात भीती निर्माण होत असेल आणि हृदयाचे ठोके जर वाढत असतील तर त्यांनी आपल्या आहारात सीताफळ घ्यावे त्यामुळे आपल्याला भीती वाटत नाही आणि हदय सुद्धा सुरक्षित राहते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Health benefits of custard apple in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x