26 April 2024 3:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

Health First | बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास झोपण्याआधी करा हे काम

suffering from constipation

मुंबई, १२ जून | खाण्याच्या, झोपण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेकांमध्ये बद्धकोष्ठतेचा त्रास वाढत आहे. या त्रासामुळे काही पदार्थांच्या सेवनाचा आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. म्हणूनच बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी औषधोपचारांसोबतच आहारामध्ये काही बदल करणे आवश्यक आहेत. बद्धकोष्ठतेचा वारंवार त्रास होत असेल तर लोक अनेकदा वेगवेगळी औषधे घेतात. या औषधांचा चुकीचा परिणामही आपल्या आरोग्यावर होऊ शकतो. जर तुमचेही पोट साफ होत नसेल तर रात्री झोपण्याआधी खालील उपाय करा.

* मातीच्या भांड्यात त्रिफळा पावडर भिजवा. त्यानंतर हे पाणी गाळून प्या.
* भिजवलेल्या अळशीचे पाणी प्या आणि अळशी चावून खा.
* एक चमचा इसबगोलची पावडर दुधात वा पाण्यात मिसळून प्या.
* थोडेसे मनुके पाण्यात भिजवा. हे पाणी प्या आणि मनुके चावून खा.

रात्री हे करुन नका:
* रात्रीच्या जेवणात जंक फूड वा प्रोसेस्ड पदार्ख खाऊ नका. या पदार्थांमध्ये फायबर नसते. ज्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.
* रात्री उशिरा दारु वा सिगारेट प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता जाणवते
* आयर्न वा कॅल्शियमच्या सप्लिमेंट घेत असल्यास त्या रात्री घेऊ नका. यामुळेही बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.
* रात्रीचे दुधाचे पदार्थ खाऊ नका.
* रात्री उशिरा चहा वा कॉफीचे सेवन करा. यामुळे पाचनक्रिया बिघडते.

* तिळाला आपल्या आहारात समाविष्ट करा:
तीळ आतड्यातील तेल आणि मॉइश्चर ची कमतरता दूर करतो.

* पुदिना आणि आल्याचा चहा प्या:
हा चहा प्यायल्याने पोटाच्या स्नायूंना आराम मिळेल.आल्याच्या उष्णते मुळे बद्धकोष्ठता दूर होते.

* एरंडेल तेल:
एरंडेल तेल अनोश्यापोटी घेतल्यावर बद्धकोष्ठतेचा त्रास नाहीसा होतो.पचनासाठी देखील हे चांगले आहे. हे जास्त प्रमाणात घेऊ नये. या मुळे त्रास होऊ शकतो.

* कोरफड:
हे केसांसाठी त्वचेसाठी तर चांगले आहेच परंतु बद्धकोष्ठतेचा त्रास देखील दूर करतात.हे शरीरासाठी फायदेशीर आहे. आतड्यांमधील पाण्याचे प्रमाण वाढवून बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करण्यात उपयोगी आहे.आपण कोरफड रसाचा वापर देखील करू शकता.

 

News Title: If you are suffering from constipation do these things before going to bed news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x