29 March 2024 11:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर दैनिक चार्टवर ट्रेंड लाइन ब्रेकआउट देत आहे, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स स्टॉकबाबत तज्ञ उत्साही, नवीन टार्गेट प्राइस जाहीर, किती परतावा मिळणार? Bonus Share News | सुवर्ण संधी! ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, वेळीच एन्ट्री घेऊन फायदा घेणार? IFCI Share Price | शेअरची किंमत 39 रुपये! IFCI शेअर चार्ट पॅटर्नमध्ये सकारात्मक वाढीचे संकेत, यापूर्वी 350% परतावा दिला Infosys Share Price | इन्फोसिस शेअरला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, या पातळीवर टिकल्यास अल्पावधीत उच्चांक किंमत स्पर्श करणार Mutual Fund SIP | मार्ग श्रीमंतीचा! या 10 म्युच्युअल फंड SIP दरवर्षी 40% ते 71% परतावा देतं आहेत, सेव्ह करा यादी Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, ही योजना देईल मोठा व्याज दर
x

शहाणपण सुचलं? | कोविशील्ड व्हॅक्सिनचा इतर देशांना पुरवठा बंद | देशांतर्गत लसीकरणावर जोर

Astrazeneca, Covshield vaccine, Domestic vaccination

नवी दिल्ली, २५ मार्च: देशात मागील २४ तासात ५३ हजार ४७६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मागील पाच महिन्यात ही एका दिवसातील सर्वाधिक रुग्णवाढ आहे. यासोबतच भारतातील करोनाबाधित रुग्णसंख्या १ कोटी १७ लाख ८७ हजार ५३४ वर पोहोचली आहे. याशिवाय २५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात आतापर्यंत १ लाख ६० हजार ६९२ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

भारतामध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत आणि यामध्येच एक मोठी बातमी समोर येत आहे. केंद्र सरकार आता ॲस्ट्राझेनेकाची लस इतर देशांना देणार नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशांतर्गत लसीकरणावर फोकस करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. देशात ॲस्ट्राझेनेका-ऑक्सफर्डच्या कोरोना व्हॅक्सिनची निर्मिती सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया कोविशील्ड नावाने करत आहे.

भारत सरकारने दोन दिवसांपूर्वीच कोविशील्ड व्हॅक्सिन संदर्भात नवीन गाइडलाइन जारी केली आहे. त्यानुसार ‘कोविशील्ड’ लसीच्या दोन डोसमधील कालावधी वाढवण्यात आला आहे. आता कोविशील्डचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस ६ ते ८ आठवड्यांनी दिला जाईल. सध्या हा कालावधी ४ ते ६ आठवडे इतका आहे. कालावधी वाढवण्याचा निर्णय फक्त कोविशील्ड लसीवर लागू होईल, कोव्हॅक्सिनवर नाही.

 

News English Summary: In the last 24 hours, 53 thousand 476 new patients have been registered in the country. This is the highest one-day increase in the last five months. In addition, the number of coronary heart disease patients in India has reached 1 crore 17 lakh 87 thousand 534. In addition, 251 patients have died. So far 1 lakh 60 thousand 692 people have died due to corona in India. This information has been given by the Union Ministry of Health.

News English Title: India will not supply Astrazeneca Covshield vaccine to other countries to focus on domestic vaccination news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x