26 April 2024 1:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

Influenza Symptoms and Causes | इन्फ्लुएंझा आजाराची लक्षणे, कारणे आणि उपचार - नक्की वाचा

Influenza symptoms and causes

मुंबई, २० ऑगस्ट | इन्फ्लुएंझा हा आजार आरएनए या विषाणूमुळे होतो. हा एक सामान्य संसर्गजन्य आजार असून जो खोकला आणि शिंका याद्वारे पसरतो. हिवाळ्यात ह्या आजाराचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे याला मोसमी फ्लू असेदेखील म्हणतात. आरएनए विषाणू हा श्वसनमार्गाला जास्त परिणाम करतो. इन्फ्लुएंझाचे निराकरण १ आठवड्यात किंवा १० दिवसात सुद्धा होते. ५ वर्षाखालील व ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये इन्फ्लुएंझा हा आजार होऊ शकतो.

थंडी वाजून ताप येणे, डोके व अंग अतिशय दुखणे ही या रोगाची प्राथमिक लक्षणे आहेत. काही वेळा डोकेदुखीमुळे प्रकाश सहन होत नाही. या रोगामुळे लहान मुलांना व ज्येष्ठ नागरिकांना फुफ्फुसशोथ, हृदयाच्या स्नायूंचा शोथ (मायोकार्डायटिस) किंवा मस्तिष्कावरणशोथ (मेनिनजायटिस) होऊ शकतो. तापामुळे शरीराचे तापमान ३८० ते ४१० सेल्सिअस पर्यंत वाढते.

इन्फ्लुएंझा आजार लक्षणे, करणे आणि उपचार (Influenza symptoms and causes in Marathi) :

याची काही मुख्य लक्षणे आणि चिन्हे आहेत जसे की दुखणारा घसा, वाहणारे नाक आणि शिंका ही आहेत. तसेच भूक न लागणे, सुका खोकला, जुलाब, मळमळ, नाक बंद होणे, घसा दुखणे, अचानक ताप येणे अशीही लक्षणे दिसू शकतात. याचे मुख्य कारण म्हणजे याचे ३ प्रकार आहे जसे ए,बी,सी इत्यादी. प्रकार ए आणि बी मुळे श्वसनमार्गाच्या गंभीर स्वरूपाचे संसर्ग होऊ शकतो आणि प्रकार सी मुळे साथीच्या रोगासारखी परिस्थिती निर्माण होते. हा विषाणू एका व्यक्ती कडून दुसऱ्याकडे खोकला आणि शिंका यामार्फत जातो.

लक्षणांवरुन या रोगाचे निदान केले जाते. प्रथमावस्थेत रुग्णाला प्रतिशोध औषधे, तापनाशक, वेदनाशामक अथवा फुफ्फुसशोथ झाल्यास प्रतिजैविके दिली जातात. साथीच्या वेळेस प्रतिबंधक लस टोचून घेणे आवश्यक असते. आहारात मसाल्याचे पदार्थ व अतिशीत पदार्थ वर्ज्य असून प्रथिनयुक्त आहार घ्यावा असा सल्ला दिला जातो. तोंडावर रुमाल बांधल्यास स्त्राव आजूबाजूलापसरत नाही. या रोगावरील हा एक प्रतिबंधक उपाय आहे. यावर उपचार म्हणून भरपूर पाणी प्यावे, अधिक तपासणी साठी डॉक्टरांकडे जावे आणि तसेच शक्य तेवढा आराम करावा.

Influenza वर करावयाची तपासणी आणि उपचार:
1) इन्फ्लुएंझा’वर करावयाचे घरगुती उपाय:
Influenza वर आपण घरगुती उपाय देखील करू शकतो.ह्यात आपण कमी प्रमाणात पाणी पिणे तसेच साधे हलके फुलके अन्न खाणे जसे की दाळ खिचडी इत्यादी असे घरगुती स्वरुपाचे उपचार देखील करू शकतो.

2) औषधोपचार करणे:
इन्फ्लुएंझा बरा होण्यासाठी आपण औषधोपचार पण करू शकतो. कारण औषधोपचार केल्याने इन्फ्लुएंझा लवकरात लवकर बरा होण्यास मदत होत असते. म्हणुन नियमित औषधोपचार हा देखील एक उत्तम मार्ग आहे Influenza बरा करण्याचा.

3) नाकाचे औषध घेणे:
इन्फ्लुएंझा होण्याचे प्रमुख कारण आपल्या नाका-तोंडात तसेच मुखात इन्फ्लुएंझा virus चा प्रवेश होणे हे मुख्य कारण असते. म्हणजेच इन्फ्लुएंझा होण्याचे कारण नाकासंबंधीत श्वसनासंबंधित समस्या देखील असु शकते. म्हणुन इन्फ्लुएंझा आजार बरा होण्यासाठी नाकाचे औषध पण घेता येते.

4) जास्तीत जास्त विश्रांती घेणे:
इन्फ्लुएंझा झाल्यावर जास्तीत जास्त प्रमाणात आराम करण्याचा सल्ला डाँक्टर आपल्याला देत असतात कारण याने आपल्या शारीरीक उर्जेची बचत होते. परिणामस्वरूप आपण लवकर ह्या आजारातुन बरे होत असतो. म्हणुन अशा आजाराच्या काळात आपण जास्तीत जास्त विश्रांती घेणे आपल्या आरोग्यासाठी हितकारक असते.

5) वेदनानाशक औषधांचे सेवन करणे:
इन्फ्लुएंझा झाल्यावर आपल्या पुर्ण शरीरात वेदना होत असतात. ज्याच्याने आपल्याला खुप त्रास तसेच पीडा देखील होत असते. याचसाठी डाँक्टर आपल्याला वेदना थांबविण्यासाठी काही औषधे घेण्याचा सल्ला देखील देतात. जेणेकरून आपला त्रास तसेच वेदना काही प्रमाणात का होईना कमी होतील. म्हणुन इन्फ्लुएंझा झाल्यावर वेदनानाशक औषधांचे उपचार करणे देखील फायदेशीर ठरते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Health Title: Influenza symptoms and causes in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x