Health First | रात्री तुम्हाला झोप येत नाही? | मनात विचार येतं राहतात? | हे उपाय करून पाहा
मुंबई, १८ सप्टेंबर | आपण आज मोठी प्रगती केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित केलं आहे. पण आता आपण या तंत्रज्ञानाच्या आहारी गेला आहे. तंत्रज्ञानाचा अतिवापर हे निद्रानाशाचं प्रमुख कारण म्हणून समोर आलं आहे. चिंता, मानसिक तणावाचा आपल्या झोपेवर परिणाम होत असतो. दिवसभराच्या धावपळीनंतर आपल्याल रात्री नियमित सात-आठ तासांची झोप घेणं निरोगी आरोग्यासाठी आवश्यक आहे.
रात्री तुम्हाला झोप येत नाही?, मनात विचार येतं राहतात?, हे उपाय करून पाहा – Insomnia and treatment health issue information in Marathi :
कोणत्या वयोगटासाठी किती झोप पुरेशी? (Insomnia diseases Causes and Home Remedies) :
* सहा ते नऊ वयोगटातील मुलांसाठी नऊ ते 11 तासांचा झोप आवश्यक आहे.
* 12 ते 16 वयोगटातील युवकांसाठी आठ ते 10 तासांची झोप आवश्यक आहे.
* 18 ते 64 वयोगटातील प्रौढांसाठी सात ते नऊ तास झोप गरजेची आहे.
* 65 वर्षांवरील वृद्धांसाठी सात ते आठ तास झोप गरजेची आहे.
निद्रानाश टाळण्यासाठी करून पाहा हे 10 उपाय :
दिवसा वामकुक्षी घेऊ नका:
दुपारच्या जेवणानंतर तुम्ही 20 मिनिटांची वामकुक्षी घेत असला तर ते आधी बंद करा. तुम्हाला दिवसभर प्रसन्न ठेवण्यास वामकुक्षीची मदत होत असेल पण या सवयीमुळे तुमची रात्रीची झोप बिघडते. परिणामी तुमचा दुसरा दिवस खराब जातो. दिवसभर तुम्ही निरुत्साही राहातात.
Insomnia Symptoms and causes :
धुम्रपान व मद्यपान टाळा:
झोपण्यापूर्वी मद्यपान केल्यामुळे मस्त झोप येते, हा चुकीचा समज आहे. मद्यपानामुळे तुम्हाला झोप आली तरी ती सुखकारक नसते. या झोपेमुळे आरोग्य बिघडते. तसंच धुम्रपानाचंही आहे. धुम्रपानामुळे आरोग्यदायी झोप मिळत नाही . सिगारेटमध्ये निकोटीन असतं, त्यामुळे झोप उडते. धक्कादायक म्हणजे धुम्रपानामुळे सेक्सलाईफवर गंभीर परिणाम होतात.
चहा-कॉफी टाळा:
चहा व कॉफीत आढळणाऱ्या कॅफिन या उत्तेजक घटकामुळे तुम्ही झोप उडते. तसेच कॅफिनमुळे रात्री वारंवार लघवी येते. त्यामुळे झोपमोड होते. त्यामुळे रात्रीच्या वेळी झोपण्यापूर्वी चार ते सहा तास अगोदर चहा किंवा कॉफी सेवन करू नये.
अतिप्रमाणात पाणी पिऊ नका:
भरपूर पाणी पिणं हे आरोग्यासाठी उत्तम आहे. पण, रात्री झोपण्यापूर्वी अतिपाणी पिणं आरोग्यासाठी घातक आहे. जास्त पाणी प्यायल्यानं वारंवार लघवीसाठी उठावं लागतं. त्यामुळे तुमची झोपमोड होऊ शकते.
रात्री भरपूर खाऊ नका:
तुम्हाला जे काही खायचं आहे ते दिवसा खा. रात्री हलका आहार घ्या. अति मसालेदार देखील टाळा. कारण पित्त व अपचनाचा विकार होऊन तुमची झोप बिघडू शकते.
झोपण्यापूर्वी व्यायाम टाळा:
काही लोक सकाळी व्यायाम करण्याऐवजी सायंकाळी उशीरा करतात. यामुळे तीव्र निद्रानाश होण्याची शक्यता आहे. व्यायाम सकाळीच कारणं आरोग्यासाठी उत्तम असते. पण तुम्हाला संध्याकाळी व्यायाम करावयाचा असल्यास तो झोपण्यापूर्वी किमान चार तासआधी करा.
झोपेच्या गोळ्या घातकच:
रात्री झोप येत नाही म्हणून काही लोक चक्क झोपेच्या गोळ्या घेतात. मात्र, तसं करणं आरोग्यासाठी घातक आहे. झोपेच्या गोळ्यांच्या अतिवापरामुळे आरोग्यावर दूरगामी परिणाम होतो.
अनावश्यक गोष्टींचा विचार टाळा:
झोपण्यापूर्वी अनावश्यक गोष्टींचा विचार करत बसू नका. चिंता करू नका. यामुळे तुमची झोपमोड होऊ शकते. मेंदूला शांत होण्यासाठी थोडा वेळ देणं महत्त्वाचं आहे.
चुकीच्या स्थितीत झोपू नका:
सरळ पाठीवर किंवा गुडघ्याजवळ उशीचा आधार घेऊन एका कुशीवर झोपणं कधीही उत्तम. पण काही लोक पोटावर किंवा पाय पोटात घेऊन झोपतात. त्यामुळे तुमच्या अस्थिबंधनावर ताण येऊन झोपमोड होऊ शकते.
झोप येण्यापूर्वीच बिछान्यावर पडू नका:
झोप येण्यापुर्वीच बिछान्यावर लोळणे हे बऱ्याच लोकांमध्ये निद्रानाशाचे प्रमुख कारण असल्याचे दिसून आहे आहे . झोप येण्यापूर्वी बिछान्यावर पडताना मेंदूचे कार्य चालू असते. यामुळे अनेकांना अर्धवट झोप मिळते . म्हणून मेंदू थकल्यानंतर व झोप आल्यावरच बिछान्यावर झोपायला जा.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.
News Title: Insomnia and treatment health issue information in Marathi.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- IREDA Share Price | IREDA शेअर ना ओव्हरबॉट ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत - SGX Nifty
- Government Job | महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागात 219 रिक्त पदांसाठी भरती, पगार 1,42,400 रुपये
- Smart Investment | कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्याआधी 'या' गोष्टींची पुरेपूर काळजी घ्या, अन्यथा तोटा होईल
- Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत अपडेट, पेनी शेअर घसरणार की तेजीत येणार - NSE: IDEA