13 December 2024 10:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
x

खाजगी ऑफिसमध्ये 50 टक्के कर्मचारी ठेवण्याची सूचना | राज्य सरकारकडून नव्या गाईडलाईन्स

Maharashtra, Covid 49, New Guidelines

मुंबई, १९ मार्च: मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. अनेक ठिकाणी शेकडो-हजारोंच्या संख्येने कोरोना रुग्ण सापडत असल्यामुळे राज्य सरकारने मिशन बिगीन अंतर्गत नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यानुसार, धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे आणि सभा अशा इतर कारणांसाठी गर्दी करता येणार नाही.

यासोबतच, राज्यातील सर्व खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये 50 टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवावी लागेल. यात, आरोग्य, इतर अत्यावश्यक सेवा, आस्थापना आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रांना वगळण्यात आले आहे. त्याशिवाय नाट्यगृहे आणि सभागृहे यामधील उपस्थिती देखील 50 टक्के असावी. तसेच त्यांचा उपयोग धार्मिक, सामाजिक, राजकीय , सांस्कृतिक मेळावे आणि सभा अशा इतर कारणांसाठी करता येणार नाही, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

राज्य शासनाने कोविडचा वाढत प्रादुर्भाव पाहता मिशन बिगीन अंतर्गत राज्यातील सर्व खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये ( आरोग्य व इतर अत्यावश्यक सेवा व आस्थापना तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळून) 50 टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याबाबत आदेश निर्गमित केले आहेत. सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या विभाग व कार्यालय प्रमुखांनी कोविड परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्चित करावे असेही या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे, पुन्हा एकदा खबरदारीसाठी कडक उपाययोजना आखण्यात येत असल्याचं दिसून येत आहे.

 

News English Summary: The state government has issued orders to maintain 50 per cent staff presence in all private offices and establishments in the state (excluding health and other essential services and establishments as well as manufacturing sector) under Mission Begin in view of the growing prevalence of covid. The order also said that the heads of departments and offices of all government and semi-government offices should take into account the cowardly situation and determine the presence of staff in their offices. So, once again, it seems that strict precautionary measures are being taken.

News English Title: Maharashtra government has issued orders to maintain 50 per cent staff presence in all private offices and govt offices news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x