14 December 2024 4:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Health First | लिपस्टिक स्त्रीयांचं सौंदर्य खुलवतं | पण अतिवापर आहे जीवघेणा

Overuse of lipstick, dangerous, Health article

मुंबई, २ जानेवारी: आजच्या बदल्यात जीवनशैलीनुसार आपल्या दैनंदिन वापरातील प्रत्येक गोष्टींमध्ये बदल घडत आहेत. खाण्यापिण्याच्या सवयी, कपडे, वाहने, व्यायामाच्या पद्धती आणि मेकअप किटमधील सौंदर्य प्रसाधनेसुद्धा. विशेष म्हणजे त्यातही ट्रेंडनुसार तुमच्या मेकअपचं सामान देखील हळूहळू बदलू लागले आहे. तुमच्या गरजेनुसार निरनिराळ्या सौंदर्य उत्पादनांचा समावेश केला जातो. बाजारात कितीही नवीन उत्पादने उपलब्ध असली तरी महिलांच्या मेकअप किटमधली लिपस्टिकची जागा कोणतंही प्रोडक्ट घेऊ शकणार नाही. प्रत्येक महिलेकडे त्यांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या रंगाची लिपस्टिक असतेच.

लिपस्टिकमुळे तुमच्या सौंदर्यात भर पडत असली तरीही शक्य असल्यास हे ब्युटी प्रोडक्ट वापरणं टाळा. कारण लिपस्टिकमध्ये प्रचंड प्रमाणात केमिकलचा समावेश असतो. लिपस्टिकच्या नियमित वापरामुळे तुमचे ओठ काळे आणि कोरडे होऊ लागतात. लिपस्टिकमध्ये पॅराबेन, ट्रायक्लोसेन आणि सोडियम लॉरेल सल्फेट ही घातक रसायने असतात. यामुळे अ‍ॅलर्जी होण्याचाही धोका असतो. केमिकलयुक्त लिपस्टिक वापरण्याऐवजी घरात तयार केलेले लिप बाम वापरा.

हे सांगण्या मागील मुख्य कारण म्हणजे रेवलाॅन, नायका, लॅक्मे, आणि इतरही आंतरराष्ट्रीय ब्रँडच्या लिपस्टिक आजकाल सहज उपलब्ध होतात. बहुतेक वेळा मोठे कार्यक्रम लग्न, मुंज, डोहाळे जेवण, बारसं, रिसेप्शन अशा कार्यक्रमांना जाताना महिला वर्गाचा उत्साह आणि मेक अप करायची हौस यांना नुसता बहर येतो.

पण ही लिपस्टिक लावण्यापूर्वी कधी विचार केला आहे का.. सततचं लिपस्टिक लावणं कसं नुकसान करु शकतं? नाही माहीत? मग तर नक्की वाचा.

कारण लिपस्टिक तयार करताना मेण, पॅराफिन, वसा, तेल, एमोलियंटस यांच्या मिश्रणाने बनवली जाते. मधमाशीच्या पोळ्यातील मेण हे अत्यंत उत्तम मेण मानलं जातं. पण सगळ्याच कंपन्या ते‌ वापरतात असं नाही. काही लोकल ब्रँड असलेल्या कंपन्या माती, लेड आॅक्साईड यांचाही वापर करतात. मेणामुळे जी स्टिक असते ती व्यवस्थित बांधली जाते आणि लिपस्टिकच्या रोलमध्ये घट्ट उभी करता येते.

तुम्ही कदाचित प्रेझेंटेबल म्हणून नक्की ओळखले जाल. पण तुमच्या शरीरावर याचे‌ काय वाईट परिणाम होतात हे आज लगेच नाही पण काही दिवसांनी समजेल. लिपस्टिक तयार करताना जे धातू लेड म्हणजे शिसं, कॅडमियम यांचा त्वचेशी खूप जवळचा संपर्क येतो. ओठ, डोळे त्वचा हे नाजूक अवयव आहेत. रोज लिपस्टिक लावल्यामुळे शिसं सातत्यानं आपल्या पोटात जातं. ओठांना या धातूंमुळे काळपटपणा येतो. त्यामध्ये असलेली आर्द्रता कमी होते व ओठ कोरडे पडतात. त्यांना आलेली शुष्कता ओठांना चिरा पडणं, त्वचा उकलायला लागणं आणि हा कोरडेपणा वाढला तर‌ ओठ फुटणं, रक्त येणं इथवर परिणाम करते.

 

News English Summary: Lipstick is made from a mixture of wax, paraffin, fat, oil and emollients. Beeswax is considered to be the best wax. But not all companies use it. Companies with some local brands also use clay, lead oxide. The stick that is made of wax is properly tied and can be tightened in a roll of lipstick. You will probably be known as presentable. But the effects of this on your body are not immediate but will be known in a few days.

News English Title: Overuse of lipstick is dangerous for health article news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x