29 March 2024 3:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

Health First | कंबर दुखत आहे मग करा त्यावर हे उपचार

home remedies for back pain

मुंबई १ मे : सध्या कंबरेच्या दुखण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. व्यक्ती स्त्री असो की पुरुष, तरुण असो की वृद्ध, त्रास मात्र कंबरेच्या दुखण्याचा. मग कधी कोणते तरी तेल चोळ, कधी कशाने तरी शेक घे, कोणत्याही गोळ्या घे असे नाना प्रकार वैद्याच्या सल्ल्याशिवाय चाललेले असतात. त्यामध्ये अपयश आले की मग वैद्याकडे जाऊन आपली तब्येत दाखवायची, अशी सर्वसाधारण पद्धत आढळते. कंबरदुखी नेमकी कशामुळे होत आहे याचे कारण शोधणे प्रामुख्याने आवश्यक असते. ते न शोधताच स्वतःचे स्वतः उपचार केले तर ते तापदायक ठरू शकते. म्हणून सर्वप्रथम कंबरदुखीची विविध कारणे लक्षात घेतली पाहिजेत.

कंबरदुखी टाळण्यासाठी पाहू या काय आहेत उपाय-

ताठ बसावे
बसतांना नेहमी ताठ बसावे, मात्र बराच वेळ ताठ बसणेही चुकीचे आहे. बराच वेळ ताठ बसल्याने कंबरेवर ताण येत असतो. खूप वेळ एकाच स्थितीत काम करू नये.

असं करून पाहा
जर सलग ८ ते १० तास काम करायचे असेल तर मधे-मधे जागेवरुन उठावे. कंबर सैल सोडावी. पाठीला आराम देणंही गरजेचं आहे.

जास्त वजन उचलल्याने कंबर दुखू शकते
जेव्हा तुम्ही जड सामान उचलता त्यावेळी तुम्ही ते कसे उचलता हे महत्वाचं असतं. हाडे, स्नायू आणि हाडांच्या संबंधित इजा तेव्हाच होतात जेव्हा तुम्ही ते चुकीच्या पद्धतीने उचलता.

असं करून पाहा
जड सामान उचलतांना नेहमी पायांच्या पंजांवर शरिराचा भार द्यावा. कंबर दुखत असल्यास जड सामान उचलणे टाळावे. तसेच जमिनीवरील वस्तू उचलतांना कंबरेत न वाकता, गूढघ्यांवर वाकावे.

बेड रेस्ट घ्यावी
कंबर दुखीवर उत्तम उपाय म्हणजे आराम करणे. मात्र सारखं झोपून राहणंही कंबरदुखीला आमंत्रण ठरू शकते.

असं करून पाहा
कंबर दुखत असतांना आराम करा. मात्र आधार घेत मधे-मधे उठून बसावे.

व्यायाम करू नये
कंबरदुखी जास्त असेल तर व्यायाम करणं टाळावं. डॉक्टरांच्या सल्ल्याने फिजिओथेरिपी, व्यायाम अथवा मसाज करुन घ्यावा.

असं करून पाहा
कंबर दुखत असतांना कंबर आणि पोटांच्या खालील अवयवांचा व्यायाम करावा. व्यायाम न केल्याने कंबरेचे स्नायू कमकुवत होतात. पोहणे, सायकल चालवणे, फिरणे हे कंबरेसाठी उत्तम व्यायाम आहेत.

कंबर दुखीत हा उपाय करून पाहा
सकाळी मोहरी किंवा खोबरेतेल लसूण घालून गरम करावे आणि त्या तेलाने कंबरेची मालीश करावी. दुखत असलेल्या जागी गरम कापडाने शेक द्यावा.

News English Summary: Currently, the incidence of low back pain is increasing. Whether the person is a woman or a man, young or old, the problem is back pain. Then there are various types of oil rubbing, sometimes shaking with something, taking some pills without the advice of a doctor. It is mainly necessary to find out the cause of low back pain. It can be irritating if you treat yourself without finding it. So first of all the various causes of low back pain should be considered.

News English Title: Reasons and remedies of back pain news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x