20 April 2024 11:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची महिलांच्या फायद्याची खास योजना, अल्पावधीत मिळतील 2,32,044 रुपये Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना 'या' बँकेत FD वर बंपर परतावा, तब्बल 9.50 टक्क्यांपर्यंत व्याज मिळवा Gold Rate Today | बोंबला! आजही सोन्याचा भाव मजबूत उसळला, तुमच्या शहरातील कॅरेट प्रमाणे नवे दर तपासून घ्या Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला
x

Health First | बॉडी स्प्रे वापरता? | मग आधी हे जाणून घ्या

Skin care be careful

मुंबई, 19 जून | घामाच्या दुर्गंधीपासून मुक्त होण्यासाठी लोक शरीरातून येणाऱ्या घामाच्या वासापासून मुक्त होण्यासाठी बॉडी स्प्रे करतात. काही लोकांना बॉडी स्प्रे करणे एवढे आवडते की ते वेगवेगळे बॉडी स्प्रे दररोज वापरतात. परंतु आपणास हे माहित आहे का ,की हे बॉडी स्प्रे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतात. जर आपण देखील बॉडी स्प्रे करण्याची आवड ठेवता तर त्यापासून होणाऱ्या नुकसानाबद्दल जाणून घ्या.

अनेकांना बॉडी स्प्रे अंगावर टाकायला आवडतो. फक्त घामाचा दुर्गंध येऊ नये म्हणून प्रत्येकजण बॉडी स्प्रे ,डियो , इत्यादींचा वापर करत असतात. अनेकांच्या घरात बॉडी स्प्रेचा वेगळाच कप्पा असतो. त्यात अनेक प्रकारची बॉडी स्प्रे ठेवलेले असतात. परंतु तुम्हाला कल्पना देखील नसेल की, बॉडी स्प्रे आपल्या आरोग्यासाठी किती धोकादायक ठरू शकते. परंतु ते कसे आता जाणून घेऊया.

* डिओडोरंटचा नियमित वापर केल्याने त्वचेवर लाल पुरळ उठते आणि खाज येण्या सारख्या समस्या उद्भवतात.

* बॉडी स्प्रेच्या वापरामुळे श्वासोच्छवासासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. काही लोकांना तीव्र वास असलेल्या डिओडोरंटस पासून ऍलर्जी होते.

* बॉडी स्प्रे हे घामाचा वास कमी करण्यासाठी वापरतात .परंतु घाम येण्याची प्रक्रिया या मुळे प्रभावित होते आणि येणाऱ्या घामाचा वास अधिकच घाण येतो.

* बॉडी स्प्रेच्या अति वापरामुळे अंडर आर्म्स काळे पडतात. डियो थेट त्वचेवर वापरले तर या मुळे त्वचा काळपट होते.

* परफ्युम किंवा डियो वापरताना काळजी घ्या. हे थेट त्वचेवर न लावता कपड्यांवर स्प्रे करा.

* दागिने घालण्यापूर्वी परफ्युम स्प्रे करून घ्या अन्यथा या मुळे दागिन्यांच्या चमकवर परिणाम होऊ शकतो.

* तज्ञांच्या मते शरीरातून घाम येणे चांगली गोष्ट आहे. घामामुळे शरीर डिटॉक्सिफाई होण्यास मदत होते. तसेच शरीर नैसर्गिकरित्या थंड होते. परंतु बॉडी स्प्रेमुळे शरीरातील ग्रंथी कमकुवत होतात आणि अनेक आजार उद्भवतात.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: Skin care be careful when spraying body otherwise health news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x