महागाईचा मोर्चा आरोग्य विषयक गरजांकडे | औषधांच्या किंमती वाढणार
मुंबई, २० मार्च: रोजच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू महागलेल्या असताना आता रोजची औषधं देखील महाग होणार आहेत. त्यामुळे महागाईत होरपळलेला सामान्य माणूस अजून हैराण होण्याची शक्यता आहे. सरकारने औषध निर्मिती कंपन्यांना वार्षिक होलसेल किंमत इंडेक्सनुसार किमतींमध्ये बदल करण्याची परवानगी दिली आहे. ड्रग्स प्राइस रेगुलेटर, नॅशनल फार्मास्यूटिकल प्राइसिंग अॅथॉरिटीने शुक्रवारी सांगितले की, सरकारद्वारे 2020 साठी डब्लूपीआयमध्ये 0.5 टक्क्यांचा वार्षित बदल अधिसूचना आली आहे. तर फार्मा इंडस्ट्रीचे असे म्हणणे आहे की, मॅनिफॅक्चरींगच्या खर्चात 15 ते 20 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे कंपन्या किमतीत 20 टक्के वाढीची योजना आखत आहेत. दरम्यान, औषध नियामकद्वारे डब्ल्यूपीआयनुसार अनुसूचित औषधांच्या किंमती वाढविण्यास दरवर्षी परवानगी दिली जाते.
महागाईच्या संकटात नागरिकांना औषधांसाठीही अधिकचे पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. सरकराने औषधांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना वार्षिक होलसेल प्राइस इंडेक्समध्ये 0.5 टक्क्यांची वाढ करण्याची परवानगी दिली आहे, असे नॅशनल फार्मास्युटीकल प्रायसिंग अॅथॉरिटीने शुक्रवारी सांगितले आहे. त्यामुळे वेदना कमी करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या गोळ्या, अँटिइन्फ्लाटीव्ह, कार्डियक आणि अँटिबायोटिक्ससह इतर आवश्यक औषधांच्या किमती एप्रिलपासून वाढण्याची शक्यता आहे.
कार्डिओ व्हॅस्क्युलर, डायबिटीज्, अँटिबायोटिक्स, एंटी-इन्फेक्टीव्हज आणि व्हिटॅमिनच्या निर्मितीसाठी बहुतेक फार्मा इन्ग्रीडीएंड (पदार्थ) चीनमधून आयात केले जातात, तर काही अॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रीडीएंटसाठी (आयपीआय) चीनवर जवळपास 80-90 टक्के अवलंबून आहे. गेल्या वर्षाच्या सुरूवातीस चीनमधील कोरोना संकटामुळे पुरवठ्यातील अडचणींमुळे भारतातील औषध आयातदारांचा खर्च वाढला. त्यानंतर औषधांच्या किंमती 10 ते 20 टक्क्यांनी वाढविल्या होत्या.
News English Summary: While daily necessities have become more expensive, daily medicines are also becoming more expensive. Therefore, the common man, who is in the throes of inflation, is likely to be further harassed. The government has allowed pharmaceutical companies to change prices according to the annual wholesale price index. The Drugs Price Regulator, the National Pharmaceutical Pricing Authority, said on Friday that the government has notified an annual change of 0.5 per cent in the WPI for 2020.
News English Title: The government has allowed pharmaceutical companies to change prices according to the annual wholesale price index news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा