19 April 2024 2:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

Health First | पित्ताच्या त्रासामध्ये 'आंबट फळं' खाणं अधिक त्रासदायक ठरतात का ? - नक्की वाचा

citrus fruits and acidity

मुंबई, 22 जुलै | पित्ताचा त्रास होत असल्यास आंबट फळं खाऊ नये असा अनेकांचा समज असतो. मात्र यामध्ये तथ्य नाही असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. अ‍ॅसिडीक असणारी फळं खाणं आरोग्यदायी ठरतात. कारण पचन होण्याच्या क्रियेमध्ये त्यामध्ये लाळ मिसळली जाते. परिणामी ते फळही अल्कलाईन होते. त्यामुळे अशाप्रकारची फळं अ‍ॅसिडीटीचा त्रास अधिक वाढवत नाहीत. याउलट आंबट फळांचा आहारात समावेश केल्याने पित्ताचा त्रास कमी होण्यास मदत होते.

स्वास्थ्य सुधारण्यासाठी आंबट फळांचा फायदा होतो. शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासोबतच लहान बालकांची वाढ होण्यामध्ये फायदेशीर ठरते. व्हिटॅमिन सी युक्त फळांमुळे पचन सुधारते, रोगप्रतिकारशक्ती सुधारते तसेच सर्दी-पडशाच्या त्रासापासून आराम मिळण्यास फायदा होतो.

गरोदरपणाच्या काळात संत्र, मोसंबी, ग्रेपफूट, किवी यासारखी फळं खाल्ल्यास अ‍ॅलर्जीचा धोका कमी होतो. सोबतच फॉलिक अ‍ॅसिड सुधारण्यासही मदत होते. यामुळे गर्भाची वाढही सुधारते. आंबट फळांमधील व्हिटॅमिन सी हे एक उत्तम दर्जाचे अ‍ॅन्टीऑक्सिडंट आहे. यामुळे फ्री रॅडीकल्सचा धोका कमी होण्यास मदत होते. तसेच त्वचेचे सौंदर्यही खुलते.

तुम्हांला पित्ताचा त्रास होत असल्यास, फळांचा रस पिणे टाळा. कारण त्यामध्ये साखरेचे प्रमाण अधिक आणि पोषणद्रव्यांचे प्रमाण कमी असते. अशावेळी फळांच्या रसापेक्षा अख्खी फळं खाणं अधिक फायदेशीर ठरतात. त्यामधून शरीराला अधिक फायदा मिळतो. आंबट फळ वगळता इतर फळं रिकाम्या पोटी खाणं अधिक फायदेशीर ठरतात. मिड स्नॅक किंवा अवेळी लागणार्‍या भूकेवर फळं खाणं हा अधिक फायदेशीर उपाय आहे.यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. तसेच त्यामधून मिळणारी पोषणद्रव्य शरीर अधिक चांगल्याप्रकारे शरीरात शोषून घेतले जाते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Why you should not avoid citrus fruits if you suffer from acidity in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x