14 December 2024 11:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Guru Rashi Parivartan 2024 | या 5 नशीबवान राशीत तुमची वा कुटुंबातील कोणाची राशी आहे? 30 एप्रिलपर्यंत गुरु कृपा बरसणार

Guru Rashi Parivartan

Guru Rashi Parivartan 2024 | देवगुरू गुरू वर्षातून एकदाच एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. 2023 मध्ये गुरूने मेष राशीत प्रवेश केला, जो अजूनही या राशीत विराजमान आहे. 22 एप्रिल 2023, शनिवार, सकाळी 06 वाजून 12 मिनिटांनी मेष राशीत गुरूचे संक्रमण झाले. 2024 मध्ये गुरू एप्रिलपर्यंत मेष राशीत राहणार आहे. लवकरच गुरू वृषभ राशीत प्रवेश करेल. त्यामुळे जाणून घेऊया मेष राशीत बसलेल्या गुरूमुळे कोणत्या राशी भाग्यवान ठरणार आहेत.

मेष राशी
गुरूच्या राशी परिवर्तनाचा लाभ मेष राशीच्या लोकांसाठी अनुकूल सिद्ध होईल. गुरूच्या प्रभावाने आपले नशीब बळकट होईल आणि आर्थिक लाभ प्राप्त होईल. यासोबतच तुम्हाला अचानक धनलाभ होईल आणि गुंतवणुकीचाही फायदा होईल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. गुरूच्या प्रभावामुळे तुमच्या शारीरिक सुखसोयीमध्ये वाढ होईल आणि तुम्ही पैशांची बचत करू शकाल. ज्या कामात तुम्हाला अडथळ्यांचा सामना करावा लागत होता, त्या वर्षी 2024 मध्ये गुरूच्या प्रभावामुळे तुम्हाला कार्यात यश मिळेल आणि तुमचा मानसन्मान वाढेल. तसेच 2024 मध्ये तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्तेचा फायदा होईल आणि काही चांगली बातमीही मिळू शकते. या राशीचे जे जातक सिंगल आहेत, त्यांचे लग्न 2024 मध्ये निश्चित होऊ शकते.

सिंह राशी
सिंह राशीच्या लोकांसाठी गुरूचे वृषभ राशीतील संक्रमण खूप फायदेशीर ठरू शकते. व्यावसायिक क्षेत्रात परकीय व्यवहार होऊ शकतात. जीवनसाथीसोबत सुरू असलेल्या अडचणी हळूहळू संपुष्टात येतील. गुरूच्या शुभ प्रभावाने तुमची आर्थिक स्थितीही सुधारेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. घरात पैसा येण्याचे उत्तम योग निर्माण होतील आणि त्यामुळे घसरतील वातावरण प्रसन्न राहील. उत्पन्नात वाढ होईल आणि पैशाचे नवीन स्त्रोतही तयार होतील

कन्या राशी
वृषभ राशीत गुरूच्या प्रवेशाचा कन्या राशीच्या लोकांना फायदा होईल. तुमची रखडलेली कामे पुन्हा मार्गी लागतील. करिअरमध्ये पदोन्नती मिळवण्यासाठी तुम्हाला अनेक महत्त्वाची कामे मिळू शकतात, जी तुम्हाला चांगल्या प्रकारे करावी लागतील. समृद्धी येईल. कामाच्या अनुषंगाने परदेश प्रवास संभवतो. मुलांच्या बाजूने ही चांगली बातमी मिळेल. आर्थिक स्थिती सुधारण्याच्या दृष्टीने आकस्मित फायदे होताना अनुभवू शकाल असं हा काळ असेल.

वृषभ राशी
तुमच्या राशीत धनाचा घटक असलेल्या गुरूचा प्रवेश लाभदायक मानला जातो. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि ती भक्कम होण्याच्या दिशेने प्रवास करेल. पण खर्चातही वाढ होऊ शकते. त्यामुळे तुमचे बजेट लक्षात ठेवा आणि अधिक पैसा हातात कसा थांबेल यावर देखील लक्ष ठेवा. या काळात नवीन कामाची सुरुवात शुभ राहील. वैवाहिक जीवनही मधुर राहील. आर्थिक सुधारण्याचे उत्तम आर्थिक मार्ग निर्माण होतील असा हा काळ असेल.

कर्क राशी
कर्क राशीच्या लोकांसाठी गुरूचे राशीपरिवर्तन भाग्यशाली सिद्ध होईल. गुरूच्या प्रभावामुळे वर्ष 2024 मध्ये उत्पन्नात वाढ होईल आणि नवीन स्त्रोतही तयार होतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. रोजगाराच्या शोधात असलेल्यांना प्रगतीच्या चांगल्या संधी मिळतील आणि नोकरी मिळण्याची दाट शक्यता राहील. व्यापाऱ्यांच्या सर्व व्यावसायिक योजना यशस्वी होतील आणि आपली प्रतिष्ठा वाढेल. या राशीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात ज्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे, त्यांचे अडथळे गुरूच्या प्रभावामुळे दूर होतील. त्याचबरोबर 2024 या वर्षात व्यावसायिकांना यश मिळेल. करिअर आणि व्यवसायात प्रगती आणि प्रगतीचे योग आहेत. वर्ष 2024 मध्ये कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

News Title : Guru Rashi Parivartan effect on these 5 zodiac signs 13 January 2024.

हॅशटॅग्स

#Guru Rashi Parivartan(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x