29 March 2024 1:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर दैनिक चार्टवर ट्रेंड लाइन ब्रेकआउट देत आहे, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स स्टॉकबाबत तज्ञ उत्साही, नवीन टार्गेट प्राइस जाहीर, किती परतावा मिळणार? Bonus Share News | सुवर्ण संधी! ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, वेळीच एन्ट्री घेऊन फायदा घेणार? IFCI Share Price | शेअरची किंमत 39 रुपये! IFCI शेअर चार्ट पॅटर्नमध्ये सकारात्मक वाढीचे संकेत, यापूर्वी 350% परतावा दिला
x

महागाई लपवा आंदोलन? | मतदार महागाईवरून प्रश्न विचारातील म्हणून भाजपचं सिलेंडर लपवून 'हंडा आंदोलन'

BJP JAL AAKROSH MORCHA

BJP JAL AAKROSH MORCHA | औरंगाबादमधील जलआक्रोश मोर्चासाठी तीन हजार हंडे, तर आठ हजार झेंडे घेऊन भाजप कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले आहेत. औरंगाबाद येथील जलआक्रोश आंदोलनावेळी महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. जपच्या मोर्च्याला पैठणगेट येथून सुरवात होणार असून,याठिकाणी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे.हातात हंडे घेऊन राज्यसरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे.

शिवसेनेच्या काळात सत्यानाश : फडणवीस
यासंदर्भात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, इतकी वर्षे सातत्याने महापालिकेत सत्ता असूनही संभाजीनगरमध्ये पाण्याच्या जो सत्यानाश शिवसेनेच्या काळात झाला त्याची फळं औरंगाबादकर भोगत आहेत. इथे पाणीच नाही. मोठ्या प्रमाणात लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. मी मुख्यमंत्री असताना जी योजना मंजूर केली आणि 1600 कोटी दिले. त्यात बदल करुन 600 कोटी महापालिकेने द्यावे असा निर्णय या सरकारनं केला.

एक नवा पैसा दिला नाही :
महापालिका कर्मचाऱ्यांचा पगार द्यायलाही पैसा नाही. पण एक नवा पैसा दिला नाही. केंद्राचा पैसा इकडे वळवला. त्या योजनेचा ठेकेदार काम करत नाही. अर्धा किमी कामही झालेलं नाही. 40 किमी काम करायचं आहे, 25 वर्षे लागतील अशा स्पीडने काम सुरु आहे. म्हणूनच आज संभाजीनगर भाजपकडून जलआक्रोश मोर्चा आम्ही काढत आहोत. जोपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही लढा देऊ, असा इशाराही फडणवीस यांनी दिलाय.

महागाईवरून जनता त्रस्त – भाजपची सिलेंडरला बगल आणि हंडे उचलले :
मोदी सरकार सत्तेत येण्यापूर्वी भाजपने महाराष्ट्र, मुंबई आणि देशभर डोक्यावर गॅस सिलेंडर उचलले होते. विशेष म्हणजे त्यात महिला कार्यकर्त्या आणि महिला पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर होत्या. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून प्रचंड वाढलेल्या महागाईमुळे सर्वाधिक त्रास हा राज्यातील, शहर ते गावं आणि देशातील महिलांना होतो आहे. मात्र भाजपच्या त्याच महिला आज सामान्य लोकांनी महागाईवरून प्रश्न विचारू नयेत म्हणून गॅस सिलेंडर पेक्षा हंडे-कळश्यांना प्राधान्य देत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: BJP JAL AAKROSH MORCHA in Aurangabad check details here 23 May 2022.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#Politics(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x