13 December 2024 3:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाच्या 'या' योजनेत SIP करा, खात्यात 1.31 कोटी रुपये जमा होतील EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम IPO GMP | स्वस्त IPO येतोय रे, शेअर प्राईस बँड 35 रुपये, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, GMP संकेत - GMP IPO
x

महाराजांनी सुरतेवर स्वारी करून इतिहास घडवला होता | पण सुरत'मार्गे पलायन करणाऱ्यांना समर्थन देणाऱ्या संघटनेवर नेटिझन्स संतापले

Eknath Shinde

Eknath Shinde | शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आज पुण्यातील कोथरूड येथील कर्वे पुतळ्यासमोर शिवसेना पुणे शहर प्रमुख गजानन थरकुडे आणि शिवसेनेचे माजी गटनेते पृथ्वीराज सुतार यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे यांच्या फोटोला शिवसैनिकांकडून जोडे मारो आंदोलन करण्यात आले.तर एकनाथ शिंदे विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

शिवसेनेचे नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील सहा दिवसापासून शिवसेनेविरुद्ध बंड पुकारले आहे.यामुळे राज्यामधील सत्तासंघर्ष अधिक तीव्र झाल्याचे चित्र दिसत आहे. एकनाथ शिंदेंनी आपल्याकडे ४६ आमदारांचा पाठिंबा असल्याचं दावा केला असून उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याची मागणी केली आहे. त्यामुळे राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळत आहे.

‘शिंदे’ नाव म्हणून समर्थनाचा अजब प्रकार :
मराठा क्रांती ठोक मोर्चाचे नेते आबासाहेब पाटील यांनी म्हटले आहे की, कोणीही मराठा समाजातील नेत्यांना टार्गेट करू नये. आम्ही एकनाथ शिंदे आणि तानाजी सावंत यांच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करतो. ही तोडफोड थांबवण्यात यावी. अन्यथा आम्ही देखील झेंडे काढून दांडे हातात घेऊ, असा इशारा पाटील यांनी दिला आहे. मात्र मराठा आणि शिंदे नाव याचा संदर्भ जोडून अजब समर्थन या संघटनेने केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी करू इतिहास घडवला होता, पण स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी सुरत’मार्गे राजकीय पलायन करणाऱ्यांना समर्थन देणाऱ्या या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा समाज माध्यमांवर जोरदार समाचार घेण्याय येत आहे. हा गट शिंदेच्या संपर्कातील असून ते त्यांच्या इशाऱ्यावर असं वक्तव्य करत असल्याचं नेटिझन्स बोलू लागले आहेत. तसेच हा राजकीय वाद आहे आणि त्यात तुम्ही जातीचं राजकारण आणून स्वतःचा फायदा शोधू नका असा सल्ला अनेक नेटिझन्स यांनी देत आहेत.

शिवसेना अजून आक्रमक :
तिथेच आज दुसरीकडे बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेचा आक्रमक पवित्रा सलग दुसऱ्या दिवशीही पाहायला मिळाला. आजही राज्यात मुंबई, पुणे, नाशिक अशा भागात शिवसेनेनं शक्तिप्रदर्शन केलंय. शिवसेनेचे सध्याच्या फळीतले नेतेही आता आपापल्या प्रभागात जाऊन शिवसैनिकांना मार्गदर्शन करत आहेत. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरेही कमालीचे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. संजय राऊतही शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना हे तर बिग बॉसचं घर वाटतंय असं म्हणालेत. या शिवसेनेला एकच बाप आहे असंही संजय राऊत म्हणालेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Eknath Shinde rebel against Shivsena check details 26 June 2022.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x