13 December 2024 10:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

16 बंडखोर आमदार सेनेच्या संपर्कात | फक्त 15 आमदारच फडणवीसांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बोलल्याचं वृत्त

Eknath Shinde

Eknath Shinde | शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी 38 आमदारांना घेऊन बंड पुकारले आहे. शिंदे वारंवार आपल्याकडे 50 आमदारांचे पाठबळ असल्याचा दावा करत आहे. पण, बंडखोरी करणारे 15 ते 16 आमदार आमच्या संपर्कात आहे, असा मोठा दावा शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. त्यामुळे शिंदेंच्या गोटात खळबळ उडाली आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेकडून आक्रमकपणे मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. आमदार, पदाधिकारी आणि शिवसेना शाखाप्रमुखांचे मेळावे घेतले जात आहे. मुंबईत आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना शिंदे आणि बंडखोर आमदारावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

फडणवीसांसोबत केवळ १५ आमदारच बोलले :
पण, आता भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बंडखोर आमदारांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे गुवाहाटीतील आमदारांना विश्वास देण्यासाठी बोलल्याची सूत्रांची माहिती दिली आहे. शनिवारी रात्री जवळपास 15 आमदार फडणवीस यांच्याशी बोलले, असल्याचे समोर आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटातील निम्म्याहून अधिक आमदार त्यांच्यावर नाराज आहेत. पुढील निवडणुका कठीण होतील असं त्यांचं मत निर्माण झालं आहे. राज्यभरातून कार्यकर्ते उद्धव ठाकरेंसोबत असल्याने हे आमदार धास्तावल्याचे वृत्त आहे. तसेच भाजपवर किती डोळेझाक करून विश्वास ठेवायचा असा देखील अनेकांना प्रश्न पडला आहे.

फडणवीस दिल्लीला जाणार :
दरम्यान, दुपारच्या सुमारास देवेंद्र फडणवीस हे आता दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, फडणवीस यांची चौथ्यांदा दिल्लीवारी आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कोरोनावर मात केली असून सकाळीच त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. राजभवनावर कोश्यारी दाखल झाले आहे. त्यामुळे आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आमदार मुंबईत आल्यावर अनेकजण पुन्हा फुटण्याची भाजपाला शंका असल्याने भाजपमध्ये अजून यावर स्पष्ट मत येत नसल्याचे म्हटले जाते आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Eknath Shinde rebel against Shivsena is again under danger zone check details 26 June 2022.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x