11 December 2024 5:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदे गटातील मंत्री पराभूत होणार? मालेगाव बाजार समितीत ठाकरेंच्या शिलेदाराने दादा भुसेंच्या पॅनलचा धुव्वा उडवला

Malegaon Bajar Samiti Election

Malegaon Bajar Samiti NIvadnuk | महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडून आला. त्यानंतरही अनेक घडामोडी घडल्या आहेत. या दरम्यानच्या काळात अनेकांना मंत्रिपदाची स्वप्न पडली. याशिवाय राज्यात आणखी एका मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत दिले जात आहेत. अर्थात हे संकेत कितपत खरे ठरतात ते आगामी काळात स्पष्ट होईलच.

पण सर्वसामान्य नागरिकांच्या मनात या राजकीय घाडमोडींवर नेमकं काय आहे हे समजण्यासाठी एक महत्त्वाची निवडणूक पार पडलीय. ही निवडणूक म्हणजे राज्यातील 147 कृषी उत्पन्न बाजार समितींची निवडणूक.

देशात लोकसभेची निवडणूक आणि राज्यात विधासभेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन पोहोचली आहे. पण त्या निवडणुकांआधी पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचा निकाल आज समोर आलाय. या निवडणुकीत अनेक दिग्गजांना धक्का बसलाय. यातील अनेक दिग्गज मंत्री ते आमदार हे शिंदे गटातील असून त्यांना या निवडणुकीत मोठा राजकीय धक्का बसला असून आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदे समर्थकांचं काय होणार याचे संकेत मिळाले आहे.

मंत्री दादा भुसे यांच्या पॅनलचा मालेगावात धुव्वा
मालेगावात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते अद्वये हिरे यांच्या पॅनलने जोरदार मुसंडी मारत 18 पैकी 17 जागावर दणदणीत विजय मिळवत बाजार समितीत स्पष्ट बहुतम मिळविले. पालकमंत्री दादा भुसे यांच्या पॅनलचा धुव्वा उडाला असून त्यांना फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले. भुसे यांना हा जोर का झटका धीरे से लगे मानला जात आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर होताच हिरे समर्थकांनी एकच जल्लोष केला. हा जनतेचा कौल असून आगामी काळात हाच कौल जनता सर्व निवडणुकीत देईल असा विश्वास अद्वये हिरे यांनी व्यक्त केला.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Malegaon Bajar Samiti Election big victory for Uddhav Balasaheb Thackeray Shivsena check details on 29 April 2023.

हॅशटॅग्स

#Malegaon Bajar Samiti Election(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x