20 April 2024 2:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार? Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर चार्टनुसार 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Bonus Shares | सुवर्ण संधी! फुकट शेअर्स मिळतील, या कंपनीबाबत फ्री बोनस शेअर्सची अपडेट, अल्पावधीत पैसा वाढवा Reliance Power Share Price | 4 वर्षात 1 लाखावर 25 लाख रुपये रिटर्न देणारा शेअर पुन्हा तेजीत येणार? तज्ज्ञांचा अंदाज काय? Penny Stocks | अवघ्या 63 पैसे ते 9 रुपये किमतीचे टॉप 10 पेनी शेअर्स श्रीमंत करतील, रोज अप्पर सर्किट हीट Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! तज्ज्ञांकडून इंडियन हॉटेल्स शेअर्सवर 'बाय' रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर
x

निवडणूक आयोगाने ग्राह्य धरली आकडेवारी आणि 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सुप्रीम कोर्टात, तसं झालं तर चक्र उलटी फिरणार?

Shinde Camp

Shivsena Party Symbol | राज्याचा राजकारणात मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. कारण, केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना दिलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसला आहे. शिवसेना कुणाची याचा निर्णय अखेर झाला. केंद्रीय निवडणूक आयोगाने अखेर आपला निर्णय जाहीर केला. उद्धव ठाकरे यांना मोठा झटका बसला आहे. शिवसेना नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना मिळाला आहे.

१६ आमदार अपात्र झाले तर ECI ने ग्राह्य धरलेली आकडेवारीचं काय?
एकाबाजूला सुप्रीम कोर्टाच्या निकालात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरू शकतात किंवा नाही हे अनुत्तरित असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय थोडा संयम न पाळता घाईत घेतला का याची चर्चा सुरु झाली आहे. कारण कायदेतज्ज्ञांनी अंदाज नोंदवल्याप्रमाणे आणि असे गृहीत धरल्यास कि १६ आमदार अपात्र ठरू शकतात तर मग केंद्रीय निवडणूक आयोगाने विचारात धरलेली विधिमंडळातील आकडेवारी किंवा बहुमत सुद्धा आकडेवारीत चुकेल. मग आजचा पक्ष आणि चिन्हाचा निर्णय सुद्धा उलटा फिरू शकतो का याची सुद्धा चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे मंगळवारची सुनावणी सुरु होण्यापूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगाने खूप घाई केली यावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

16 आमदार अपात्र ठरणार का?
दरम्यान, ठाकरे गटाची याचिकेच्या पहिल्या दिवसापासून ही मागणी आहे की, कोर्टाने सर्वात आधी शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय द्यावा. कारण आमदारांनी पक्षांतर बंदी कायद्याचा भंग केला आहे. त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द झाली पाहिजे असा ठाकरे गटाचा दावा आहे. दरम्यान, जर कोर्टाने मुख्यमंत्री शिंदेंसह 16 ही आमदारांना अपात्र ठरवलं तर मात्र, राज्यातील शिंदे सरकारच कोसळेल. त्यामुळेच कोर्टात सुरू असलेला हा संपूर्ण युक्तिवाद नेमका कोणत्या निष्कर्षापर्यंत पोहचतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Shinde Camp 16 MLA decision pending at Supreme court check details on 17 February 2023.

हॅशटॅग्स

#Shinde Camp(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x