15 December 2024 1:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

जम्मू-काश्मीरमधील भाजपा नेते वसीम बारी यांची अतिरेक्यांकडून गोळ्या घालून हत्या

BJP leader Wasim Bari, shot dead by militants, Bandipora in Jammu and Kashmir

श्रीनगर, ९ जुलै : जम्मू-काश्मीरच्या बंदीपोरा येथे भाजपा नेते वसीम बारी यांची अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार करून हत्या केल्याची घटना काल बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. वसीम यांच्या बंदीपोऱ्यातील दुकानाजवळ जाऊन अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात वसीम यांचे वडील बशीर अहमद आणि भाऊ उमर सुल्तान यांचादेखील मृत्यू झाल्याची माहिती जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी दिली.

जम्मू आणि काश्मीरच्या सीमारेषेवर दहशतवादी आणि भारतीय सैन्यांमध्ये सातत्यानेच चकमक सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, यावेळी दहशतवाद्यांनी बांदीपोरा जिल्ह्यातील भाजप नेते वसिम बारी यांच्या कुटुंबावर हल्ला करत तिघांना ठार केले. हल्ल्यानंतर तात्काळ घटनास्थळावरून या दहशतवाद्यांनी धूम ठोकली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत संपूर्ण परिसर सील केला आहे. तसेच, वसिमच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या 8 पीएसओंना चौकशीसाठी ताब्यातही घेण्यात आले आहे.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी वसीम यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. ‘आज आपण बंदीपोऱ्यात वसीम बारी, त्यांचे वडील आणि भाऊ गमावले आहेत. हे पक्षाचे खूप मोठे नुकसान आहे. आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत. त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही’, असे जे. पी. नड्डा म्हणाले.

 

News English Summary: BJP leader Wasim Bari was shot dead by militants at Bandipora in Jammu and Kashmir around 9 pm on Wednesday. The militants opened fire indiscriminately near Wasim’s Bandipora shop.

News English Title: BJP leader Wasim Bari was shot dead by militants at Bandipora in Jammu and Kashmir around on Wednesday News Latest Updates.

हॅशटॅग्स

#JammuKashmir(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x