20 April 2024 1:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Shares | सुवर्ण संधी! फुकट शेअर्स मिळतील, या कंपनीबाबत फ्री बोनस शेअर्सची अपडेट, अल्पावधीत पैसा वाढवा Reliance Power Share Price | 4 वर्षात 1 लाखावर 25 लाख रुपये रिटर्न देणारा शेअर पुन्हा तेजीत येणार? तज्ज्ञांचा अंदाज काय? Penny Stocks | अवघ्या 63 पैसे ते 9 रुपये किमतीचे टॉप 10 पेनी शेअर्स श्रीमंत करतील, रोज अप्पर सर्किट हीट Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! तज्ज्ञांकडून इंडियन हॉटेल्स शेअर्सवर 'बाय' रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर Infosys Share Price | भरवशाचा इन्फोसिस शेअर उसळी घेणार, दिग्गज ब्रोकिंग तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची महिलांच्या फायद्याची खास योजना, अल्पावधीत मिळतील 2,32,044 रुपये Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना 'या' बँकेत FD वर बंपर परतावा, तब्बल 9.50 टक्क्यांपर्यंत व्याज मिळवा
x

सर्व गोष्टी या मार्केटिंगचा भाग आहेत, मार्केटिंगच सर्वकाही आहे | बॅनरवरून जागतिक खेळाडूचा मोदींना टोला

boxer Vijender Singh

नवी दिल्ली, १० ऑगस्ट | टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताचं नाव उंच करण्याऱ्या विजेत्यांचा सत्कार काल (९ ऑगस्ट) दिल्लीत करण्यात आला. नवी दिल्ली येथील अशोका हॉटेलमध्ये ऑलिम्पिक पदकविजेत्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, माजी केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू, केंद्रीय राज्य क्रीडामंत्री निशित प्रामाणिक उपस्थित होते. या सोहळ्यासाठी मंचावर लावण्यात आलेलं बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अनेकांनी या बॅनरवर पदक विजेत्यांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो अधिक मोठ्या आकाराचा लावल्याबद्दल नाराजी व्यक्त केलीय. ऑलिम्पिक पदक विजेता विजेंदर सिंगनेही यासंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे.

झालं असं की पदक विजेत्यांचं काल (९ ऑगस्ट) दिल्लीत सत्कार करण्यात आला. त्यावेळी पाठी लावलेल्या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावण्यात आले होते. मंचावरील या पोस्टवर सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदक विजेत्या खेळाडूंचे फोटो होते. मात्र हे फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोच्या आकारापेक्षा फारच छोटे असल्याचं दिसत होतं. यावरुनच अनेकांनी नाराजी व्यक्त केली. ऑलिम्पिक पदक विजेता विजेंदर सिंगनेही याबद्दल ट्विट करत मोदी सरकारला टोला लगावला आहे. मंचावरील या बॅनरचा फोटो शेअर करत विजेंदरने “सर्व गोष्टी या पीआरचा भाग आहेत आणि पीआरच सर्वकाही आहे,” असा टोला लगावला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Boxer Vijender Singh criticized PM Narendra Modi over photo on banner news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x