ब्रिटीश हेराल्ड: मोदी जगात पॉवरफुल? इथेही खोटी प्रसिद्धी? ते ऑनलाईन मॅगझीन एका भारतीयाचं
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात प्रभावशाली राजकीय व्यक्ती बनल्याचे ब्रिटीश हेराल्ड’ने २०१९ च्या सर्वेक्षणातून पुढे आले. त्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मागे टाकून मोदींनी येथे बाजी मारली अशी बातमी प्रसिद्ध करण्यात आली आणि सर्वच प्रसिद्ध प्रसार माध्यमांनी कोणतीही शहानिशा न करता बातम्या प्रसिद्ध केल्या. ब्रिटीश हेराल्डने जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती निवडण्यासाठी स्वतःच्याच वाचकांचा पोल तयार केला होता. या नामांकनाच्या यादीत जगातील एकूण २५ प्रभावशाली व्यक्तींचा समावेश केला होता.
दरम्यान अखेरच्या टप्प्यात समीक्षकांसमोर केवळ ४ उमेदवारांची नावं ठेवण्यात आली. परंतु, काही ठराविक मीडिया चॅनल्सने आणि भारतीय जनता पक्षाच्या उतावळ्या नेत्यांनी ब्रिटीश हेराल्ड हे जागतिक पातळीवरील प्रसिद्ध ऑनलाईन वेब पोर्टल असल्याचे म्हटले आहे. परंतु, हे वेबपोर्टल एका भारतीय नागरिकाचे असून नुकतेच म्हणजे ६ मार्च २०१८ रोजी रजिस्टर्ड करण्यात आले आहे त्याचा खाली पुरावा.
नॅशनल हेराल्डच्या यादीत भारताचे पंतप्रधाननरेंद्र मोदी, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग या ४ नेत्यांची अंतिम नावे होती. ज्यामध्ये या सर्वांना मागे टाकत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक नंबर पटकावला. या निवड प्रक्रियेचं मुल्यांकन मतांची आकडेवारी, व्यापक संशोधनच्या आधारावर करण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. परंतु, सखोल चौकशीअंती केवळ नावात ब्रिटिश असलेले हे मॅगझिन ब्रिटिशांनी स्थापन केलेले नसून हेराल्ड मिडीया नेटवर्क नावाची भारतीय माणसाची ही कंपनी आहे. केरळमधील कोचीन हेराल्डचे संपादक अन्सिफ अशरफ हेच या ब्रिटीश हेराल्डचे मालक आहेत. अशरफ यांचे या कंपनीत एकूण ८५ टक्के शेअर्स असून मार्च २०१८ मध्ये हे ऑनलाईन मॅगझीन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे, हे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध मॅगझिन असल्याचे म्हणणे अतिशयोक्ती ठरेल. तरीही, अनेक केंद्रीय मंत्र्यांनी तसेच भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी या ब्रिटीश हेराल्डचे ट्विट रिट्विट करत हा भारताचा मोठा सन्मान असल्याचं म्हटलं आहे.
अनेक बाबींमुळे ब्रिटीश हेराल्डला आंतराराष्ट्रीय पातळीवरील नावाजलेलं म्हणणं म्हणजे विनोद ठरेल.
- ग्लोबल अलेक्सा रॅन्कींगमध्ये या मॅगझीनला २८१५८ वे रॅन्कींग आहे. (इंडिया टाईम्सला १९० वे तर एनडीटीव्हीला हेच रँकिंग ३९५ आहे).
- ट्विटरवर या मॅगझीनचे केवळ ४१२५ फॉलोअर्स आहेत. (जगप्रसिद्ध बीबीसी किंवा सीएनएनचे फॉलोअर्स मिलीयन्सच्या आकड्यात असतात. विशेष म्हणजे तुलनेत अनेक जिल्हास्तरीय मीडिया एजन्सीजचे फॉलोवर्स जास्त आहेत)
- फेसबुकवर या मॅगझीनला फक्त ५७००० फॉलोअर्स आहेत.
- मोदींबाबतच्या या पॉवरफुल ट्विटला या मॅगेझिनच्या ट्विटर अकाऊंटवरुन केवळ २४२ रिट्विट मिळाले आहेत.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- IREDA Share Price | IREDA शेअर ना ओव्हरबॉट ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत - SGX Nifty
- Government Job | महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागात 219 रिक्त पदांसाठी भरती, पगार 1,42,400 रुपये
- Smart Investment | कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्याआधी 'या' गोष्टींची पुरेपूर काळजी घ्या, अन्यथा तोटा होईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC