बंगालचे रुपांतर गुजरातमध्ये केले जाऊ शकणार नाही | बंगालनेच देशाला राष्ट्रगीत दिलं
कोलकत्ता, २४ डिसेंबर: तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षामध्ये मागील महिन्यांपासून घमासान सुरू आहे. गेल्या काही दिवसांत हे राजकीय वैर आणखी तीव्र होत असल्याचं दिसून आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला चढवला होता. अखेर ममता बॅनर्जी यांनीही भारतीय जनता पक्षाला प्रत्युत्तर देत पश्चिम बंगालचा गुजरात होऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
यावेळीही ममतांनी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधण्याची संधी सोडली नाही. त्यांनी व्यासपीठावरून उपस्थितांना संबोधित करताना भारतीय जनता पक्षावर हल्ला चढवला. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या नावाचा उल्लेख न करता, ‘बंगालचे रुपांतर कधीही गुजरातमध्ये केले जाऊ शकणार नाही. बंगालनेच देशाला राष्ट्रगीत आणि ‘जय हिंद’ची घोषणा दिली.’ भारतीय जनता पक्षाकडून सातत्याने बंगालमध्ये गुजरात मॉडेल आणण्याचे बोलले जात आहे, त्यालाच मुख्यमंत्री ममतांनी उत्तर दिले आहे.
ममतांनी भारतीय जनता पक्षाला पुन्हा एकदा ‘आऊटसायडर’चा टॅग लावत, ‘एक दिवस संपूर्ण जग बंगालला सॅल्यूट करेल. बंगालची माती जीवनाचा स्रोत आहे. आपल्याला या मातीचे रक्षण करायचे आहे. असे कुणीही नाही, जे बाहेरून येतील आणि म्हणतील, की आम्ही याला गुजरात बनवू,’ असे ममता म्हणाल्या.
दरम्यान पश्चिम बंगालमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने जोरदार तयार केली आहे. बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष घराघरात पोहोचला आहे. त्यामुळेच आपच्या कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे.
News English Summary: The Trinamool Congress and the Bharatiya Janata Party have been at loggerheads for months. In the last few days, this political animosity has intensified. Mamata Banerjee was attacked by Union Home Minister Amit Shah. After all, Mamata Banerjee has also responded to the BJP by warning that it will not allow West Bengal to become Gujarat. He made the statement while speaking at an event.
News English Title: Can not allow turn West Bengal into Gujarat says Chief Minister Mamata Banerjee news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News
- Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट