23 April 2024 2:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीजची कृपा झाली, स्वस्त GTL शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटले? Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून स्टॉक प्राईस सपोर्टसह पुढची टार्गेट प्राइस जाहीर Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, 1736 रुपयांनी स्वस्त झालं, नवे दर तपासून घ्या Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत खरेदी करा 30 शेअर्स, हे टॉप 10 पेनी शेअर्स श्रीमंत करू शकतात Vikas Lifecare Share Price | 5 रुपयाचा शेअर सुसाट तेजीत, अप्पर सर्किट हीट करून पैसे वाढवतोय, नेमकं कारण काय? Tata Technologies Share Price | तेजीत कमाई होणार, टाटा टेक्नॉलॉजी शेअरसह हे 4 शेअर्स अल्पावधीत खिसा भरणार Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, सकारात्मक अपडेटने स्टॉक सुसाट धावणार
x

केंद्र सरकारची लसीकरण रणनीती नोटबंदीपेक्षा कमी नाही | असं राहुल गांधींनी का म्हटलं?

Rahul Gandhi

नवी दिल्ली, २१ एप्रिल: देशात गेल्या 24 तासांत 2,95,041 नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दीड कोटीवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा एक लाख 82 हजारांवर पोहोचला आहे.कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना लसीकरणही वेगाने सुरू आहे. दरम्यान, केंद्राच्या लसीकरण रणनीतीवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे.

केंद्र सरकारने लसीकरण मोहिमेला गती देण्यासंदर्भात आखलेल्या धोरणावर राहुल गांधींनी टीका केली आहे. राहुल गांधींनी ट्विट केलं असून, केंद्र सरकारची लसीकरणासंदर्भातील रणनीती नोटबंदीपेक्षा कमी नाही, असं टीकास्त्र डागलं आहे. “केंद्र सरकारची लसीकरण रणनीती नोटबंदीपेक्षा कमी नाही. सर्वसामान्य माणूस रांगेत लागणार. संपत्ती, आरोग्य आणि जीव गमवणार. आणि शेवटी काही मोजक्या उद्योगपतींचा फायदा होणार,” असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

 

 

News English Summary: Congress leader Rahul Gandhi has said that the central government’s strategy on vaccination is no less than denomination. “The central government’s vaccination strategy is nothing less than denomination. The common man will line up. Wealth, health and lives will be lost. And in the end, only a handful of industrialists will benefit, “said Rahul Gandhi.

News English Title: Congress leader Rahul Gandhi criticized Modi Govt over corona vaccination program news updates.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x