19 April 2024 11:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

एक तर महामारी, त्यात पंतप्रधान अहंकारी | राहुल गांधींचं मोदींवर टीकास्त्र

Rahul Gandhi

नवी दिल्ली, २३ मे | काँग्रेस नेते राहुल गांधी कोरोनाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. रोज काही ना काही ट्विट करून त्यांनी मोदी सरकार विरोधात एक प्रकारचे ट्विटर वॉरच सुरू केलं आहे. आजही त्यांनी नवं ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. राहुल गांधी पंतप्रधान मोदींवर टीकेचे बाण सोडत असल्याने सत्ताधारी भाजपाही त्याला प्रत्युत्तर देत आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान अहंकारी असल्याचा अप्रत्यक्ष टोला हाणला आहे.

राहुल गांधी यांनी आज मोदींवर अत्यंत खोचक ट्विट केलं आहे. ‘एक तर महामारी, त्यात पंतप्रधान अहंकारी’, असं ट्विट राहुल यांनी केलं आहे. राहुल यांच्या टीकेमागे संदर्भ आहे. तो म्हणजे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांच्या विधानाचा. केंद्र सरकारने लसींचा पुरेसा स्टॉक नसल्याचं माहीत असतानाच लसीकरण मोहीम सुरू केली.

शिवाय 45 आणि नंतर 18 वर्षांवरील व्यक्तिंनाही लस देण्याची घोषणा केली. केंद्राकडे कोणतंही नियोजन नव्हतं. जागतिक आरोग्य संघटनेच्या गाईडलाईनकडे दुर्लक्ष करण्यात आलं, असं जाधव यांनी म्हटलं होतं. जाधव यांच्या या वक्तव्याची बातमीही राहुल यांनी ट्विटमध्ये शेअर केली आहे.

दरम्यान, शनिवारी राहुल गांधी यांनी मोदींच्या कुशासनामुळे देशात घडत असलेल्या अनागोंदीवर भाष्य केलं होतं. “केंद्र सरकारच्या कुशासनामुळे कोरोनासोबतच आता ब्लॅक फंगस रोगाचाही प्रादुर्भाव वाढला आहे. लसींचा तुटवडा तर आधीपासूनच आहे. त्यात आता नव्या रोगाची भर पडलीय आणि याचा सामना करण्यासाठी पंतप्रधान लवकरच टाळ्या आणि थाळ्या वाजवायचा कार्यक्रम हाती घेणार आहेत”, असा टोला राहुल गांधी यांनी लागवला होता.

 

News English Summary: As Rahul Gandhi is firing arrows of criticism at Prime Minister Modi, the ruling BJP is also responding to him. Rahul Gandhi has indirectly accused the Prime Minister of being arrogant.

News English Title: Congress leader Rahul Gandhi criticized PM Narendra Modi over mismanagement during corona crisis news updates.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x