19 April 2024 7:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

निवडणुकांमुळे कोरोना संसर्ग वाढतोय | राहुल गांधीचा प. बंगालमधील सर्व सभा रद्द करण्याचा निर्णय

नवी दिल्ली, १८ एप्रिल: देशभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे.देशात गेल्या २४ तासांमध्ये सर्वाधिक कोरोना रूग्णांची वाढ झाली आहे.दुसरीकडे ५ राज्यांच्या निवडणूकीचा प्रचार जोरात सुरू आहे.सभांना लाखो लोकांची गर्दी होत आहे. कोरोना संसर्गाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रसे नेते राहुल गांधी यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी यांनी पश्चिम बंगालमधील पुढच्या प्रचारसभा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. इतकचं नाही तर इतर पक्षाच्या सर्व राजकीय नेत्यांना देखील मोठ्या सभा घेण्यापूर्वी विचार करावा असं आवाहन त्यांनी केलं आहे.

पश्चिम बंगालमध्ये शनिवारी पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडलं. पाचव्या टप्प्यात एकूण ७९.१८ टक्के मतदानाची नोंद झाली. यानंतर राहुल गांधी यांनी करोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता महत्वाचा निर्णय घेतला आहे.

राहुल गांधी नेमकं काय म्हणाले ?
राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे की, पश्चिम बंगालसह देशभरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे मी बंगालमधील माझ्या पुढील सर्व सभा, रोड शो रद्द करत आहेत. कोरोनाची स्थिती पाहता सर्व राजकीय पक्षांनीही मोठ्या सार्वजनिक सभा घेणं टाळाव्यात. कोरोना परिस्थितीचा गांभीर्याने विचार करावा, असं आवाहन राहुल यांनी केलं आहे.

 

News English Summary: The number of corona patients in the country has increased the most in the last 24 hours. On the other hand, the election campaign of 5 states is in full swing. Millions of people are flocking to the rallies. Congress leader Rahul Gandhi has taken a big decision against the backdrop of the growing threat of corona infection. Rahul Gandhi has decided to cancel the next campaign rally in West Bengal.

News English Title: Congress Leader Rahul Gandhi in view of The Covid Situation suspend all public rallies in West Bengal news updates.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x