त्या पत्राच्या टायमिंगवरून राहुल गांधींकडून संताप | पण कपिल सिब्बल यांची आक्रमक भूमिका
नवी दिल्ली, २४ ऑगस्ट : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोमवारी अपेक्षेप्रमाणे पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. आज काँग्रेसच्या कार्यकारिणीची व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीच्या सुरुवातीलाच सोनिया गांधी यांनी आपली भूमिका मांडली. त्यांनी म्हटले की, पक्षाध्यक्षपदाच्या स्थित्यंतरासाठी प्रक्रिया सुरु करावी. जेणेकरून मला अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त होता येईल, असे सोनिया गांधी यांनी म्हटल्याचे समजते. या बैठकीच्या सुरुवातीलाच सोनिया गांधी यांनी आपल्याला पक्षाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, असे सांगितले.
काँग्रेसच्या कार्यकारी समिती महत्त्वाची बैठक नवी दिल्लीत सुरु आहे. नेतृत्वाच्या मुद्यावरुन काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. २३ काँग्रेस नेत्यांनी पत्राद्वारे पक्षनेतृत्वाचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र पाठवण्याच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पक्ष नेतृत्वाबद्दल लिहिण्यात आलेल्या पत्राच्या टायमिंगबद्दल राहुल यांनी बोट ठेवलं. राजस्थानात पक्षाचं सरकार अडचणीत असतानाच पत्र का लिहिण्यात आलं, त्या पत्रावर कार्यकारणीच्या बैठकीत चर्चा अपेक्षित असताना ते माध्यमांमध्ये कसं गेलं, असे सवाल राहुल यांनी उपस्थित केले.
भाजपासोबत हातमिळवणी करून सोनिया गांधींना पक्ष नेतृत्त्वात बदल करण्याची आवश्यकता असल्याचं पत्र लिहिण्यात आल्याचा अतिशय गंभीर आरोप त्यांनी केला. या आरोपांना माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल आणि गुलाम नबी आझाद यांनी अतिशय आक्रमकपणे प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपासोबत हातमिळवणी केल्याचा आरोप सिद्ध झाल्यास राजीनामा देईन, असा पवित्रा आझाद यांनी घेतला आहे.
कपिल सिब्बल यांनी ट्विट करून राहुल गांधींना अतिशय आक्रमकपणे प्रत्युत्तर दिलं आहे. ‘आम्ही भाजपाशी संगनमत केलंय, असं राहुल गांधी म्हणतात. राजस्थान उच्च न्यायालयात पक्षाची बाजू यशस्वीपणे मांडली. मणीपूरमध्ये भाजपा सरकारविरोधात पक्षाची बाजू मांडली. गेल्या ३० वर्षांत भाजपाच्या पथ्यावर पडेल, असं एकही विधाम केलं नाही. तरी आम्ही भाजपाची हातमिळवणी केल्याचं म्हटलं जातं,’ अशा शब्दांत सिब्बल यांनी स्पष्टपणे त्यांची नाराजी व्यक्त केली आहे.
Rahul Gandhi says “we are colluding with BJP“…Last 30 years have never made a statement in favour of BJP on any issue. Yet “we are colluding with the BJP“: Congress leader Kapil Sibal in a tweet pic.twitter.com/DGUboBswkd
— ANI (@ANI) August 24, 2020
News English Summary: Former Union Minister Kapil Sibal, who is also among the 26 letter-writers, went public with a blistering response to Rahul Gandhi’s allegation. “Rahul Gandhi says we are colluding with BJP. Succeeded in Rajasthan High Court defending the Congress party. Defending party in Manipur to bring down BJP Government. Last 30 years have never made a statement in favour of BJP on any issue yet ‘we are colluding with the BJP!'” -Kapil Sibal tweeted.
News English Title: Congress senior leader Kapil Sibal counters congress leader Rahul Gandhi’s allegations about colluding with BJP News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा