20 April 2024 3:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

लॉकडाउन संपल्यावर कोरोनाच्या समूह संसर्गचा धोका; तज्ज्ञांचं मत

Lockdown, covid 19, Community Transmission

नवी दिल्ली, १५ मे : कोरोनामुळे देशात मृत्यूंचा आकडा २६०० पार गेला आहे. तर जगात तीन लाखांचा आकडा पार झाला आहे. कोरोना व्हायरस हा केवळ ६० नॅनोमीटर एवढ्याच आकाराचा आहे. तरीही त्याने जगाला बेजार करून सोडले आहे. भारतात केवळ २६४९ लोकांनीच कोरोनामुळे जीव गमावलेला नाहीय, तर ४१८ जण असे आहेत ज्यांना लॉकडाऊनमुळे प्राण गमवावे लागले आहेत. हा आकडा ११ मे पर्यंतचा आहे.

देशभरातील लॉकडाऊनमुळे मृत्यूंचा आकडा तीन संशोधक कनिका शर्मा, अमन आणि थेजेश यांनी तय़ार केला आहे. उत्तर प्रदेशचा एका तरुण रोजगारासाठी जयपूरला गेला होता. लॉकडाऊनमुळे तो तिथेच अडकला. वीट भट्टीवर काम करून गावी पैसे पाठवत होता. काम बंद झाले. त्याने गावी फोन करून सांगितले की मी येतोय. पण तो आलाच नाही. नंतर समजले त्याने राहत्या खोलीतच आत्महत्या केली. पुण्यातील इंजिनिअरनेही अशीच भीतीने आत्महत्या केली आहे.

दुसरीकडे भारताने कोरोनाच्या समूह संसर्गासाठी तयार राहणे गरजेचे असल्याचे मत आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. भारतामध्ये लॉकडाउन शिथिल करण्याच्या पार्श्वभूमीवर चिंता व्यक्त करताना करोनाचा संसर्ग भारतामध्ये झपाट्याने होईल अशी भिती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या संदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

काही तज्ज्ञांनी भारतामध्ये समूह संसर्गाला सुरुवात झाल्याचे मत व्यक्त केलं आहे. पब्लिक हेल्थ फेड्रेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्राध्यापक के. श्रीनाथ रेड्डी हे समूह संसर्गाची व्यख्या काय आहे त्यावर भारतात समूह संसर्गाला सुरुवात झाली आहे की नाही हे सांगता येईल असं म्हटलं आहे. रेड्डी यांनी यासंदर्भात बोलताना, “भारतामध्ये आता असे अनेक रुग्ण आहेत जे परदेशात जाऊन आलेले नाहीत किंवा जे थेट कोणत्याही करोनाग्रस्त व्यक्तीच्या थेट संपर्कात आले नाहीत तरी त्यांना करोनाचा संसर्ग झाला आहे,” असं सांगितलं.

 

News English Summary: Health experts say India needs to be prepared for coronary heart disease. Expressing concern over the easing of lockdowns in India, experts have expressed fears that the corona could spread rapidly in India.

News English Title: Corona virus India Must Gear Up To Face Community Transmission Of Covid 19 after lockdown Says Health Expert News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x