29 March 2024 8:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 30 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर?
x

VIDEO - मृत्यूनंतर देखील हाल, कोरोना रुग्णांचे मृतदेह फरफटत टेम्पोत भरले

Corona virus, Covid 19, India, West Bengal

कोलकत्ता, १२ जून: कोरोना व्हायरसने भारतात हाहाकार माजवला आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या तीन लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. आज सकाळी ९ वाजता आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत भारतात तब्बल १० हजार ९५६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. या वाढीसह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ९७ हजार ५३५ वर पोहोचली आहे. तर काल गेल्या २४ तासांत ३९६ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला. त्यामुळे देशातील कोरोनाबळींची संख्या ८ हजार ४९८ इतकी झाली आहे.

दुसरीकडे देशभरात आईंक धाकदायक घटना देखील समोर येतं आहेत. कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्यावर अनेक ठिकाणी नातेवाईकांनी देखील त्यांच्याकडे पाठ फिरवल्याच्या घटना घडत आहेत. रुग्णालयात मृतदेह पडून राहीले आहे. मृत्यूनंतरही कोरोना रुग्णांच्या मृतदेहांचे हाल होत आहेत. १४ मृतदेहांचा एक धक्कादायक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह फरफटत नेत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये हा भयंकर प्रकार घडला आहे. भाजपचे नेते कैलाश विजयर्गीय यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

भारतात हळहळू लॉकडाउन शिथिल करण्यात येत असला, तरी वाढत चालेल्या रुग्णांच्या संख्येमुळे चिंतेत भर पडत आहे. त्यामुळे लॉकडाउन शिथिल करण्याचा निर्णय हानिकारक ठरण्याची शक्यता आहे. एका संस्थेनं केलेल्या अभ्यासातून भारतासाची काळजीत भर टाकणारे निष्कर्ष समोर आले आहे. जपानस्थित सुरक्षेसंबंधित नोमुरा संस्थेनं कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर देशातील 45 अर्थव्यवस्थांचा अभ्यास केला आहे. यात भारत ‘डेंजर झोन’मध्ये (धोकायदायक श्रेणी) असल्याचं म्हटलं आहे. भारतात पुन्हा कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती असून, लॉकडाउन लागू होऊ शकतो, असं नोमुरानं म्हटलं आहे.

 

News English Summary: Even after death, the corpses of Corona patients continue to rot. A shocking video of 14 bodies is currently going viral. A video has surfaced of bodies being cremated for cremation. This horrific incident has taken place in Kolkata, the capital of West Bengal. BJP leader Kailash Vijayargiya shared this video.

News English Title: CoronaVirus Marathi News video Kolkata staff dragging 14 dead bodies viral News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x