29 March 2024 5:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 30 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर?
x

पॉझिटिव्ह केसेस वाढत असल्या तरी मृत्यू दराला लगाम घालण्यास यश - डॉ. गुलेरिया

AIIMS, doctor guleria, Covid 19, Corona Virus

नवी दिल्ली, ६ जून: सध्या रोजच जवळपास १० हजार कोरोनाबाधित समोर येत आहेत, यावर गुलेरिया म्हणाले, ‘भारताची लोकसंख्या फार अधिक आहे. यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढेल. त्यामुळे आपल्याला डेथ रेटवर लक्ष द्यायला हवे. डेथ रेट कमी आणि संख्या अधिक असेल तर, फारसा त्रास होणार नाही. पॉझिटिव्ह केसेस वाढत असल्या तरी घाबरू नका. डेथ रेटला लगाम घालण्यास आपल्याला यश आले आहे. ही आनंदाची गोष्ट आहे.

डॉक्टर गुलेरिया यांनी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनवरही यावेळी भाष्य केले. ते म्हणाले यावर अभ्यास सुरू आहे. आतापर्यंत जी माहिती मिळाली आहे. त्यानुसार, हे औषध लाभदायक आहे. हे सुरक्षित औषध आहे. यामुळे अधिक सायडिफेक्ट होत नाहीत. ज्या लोकांनी हे औषध घेतले होते, त्यांच्यात कोरोना व्हायरसची लक्षणे कमी प्रमाणात दिसून आली. मात्र, कुठल्याही ठोस निष्कर्षावर पोहोचने योग्य होणार नाही.

कोरोना हा एक महाव्हायरस आहे. काही दिवस राहणारच. व्हॅक्सीनसाठी अद्याप वेळ लागेल. हे वर्ष संपेपर्यंत अथवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला व्हॅक्सीन येईल. मात्र, पुढील दोन-तीन महिन्यात औषध तर येईलच, असेही गुलेरिया म्हणाले.

दुसरीकडे महाराष्ट्रात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार, “महाराष्ट्र शासन रेमडेसिविरचे १० हजार इंजेक्शन खरेदी करणार आहे. प्रयोगशाळा, प्राणी आणि क्लिनिकल अभ्यासाच्या पुराव्यांच्या आधारे MERS- CoV आणि SARS मध्ये यास आशादायक परिणाम मिळाला आहे, जोदेखील कोरोना व्हायरसमुळे होतो”. पुढे त्यांनी सांगितलं आहे की, “जागतिक आरोग्य संघटना करोनाच्या उपचारात त्याचे काही सकारात्मक परिणाम होऊ शकतात असं सुचवते. हे औषध अत्यंत महाग असून गरीब लोकांना देण्याच्या दृष्टीने व्यवस्था केली आहे”.

 

News English Summary: At present, about 10,000 corona virus are encountered every day, to which Guleria said, “India’s population is very large. This will increase the number of positive patients. So we have to look at the death rate. If the death rate is low and the number is high, there will not be much trouble. Don’t panic even though the positive cases are increasing. We have succeeded in curbing the death rate.

News English Title: Do not panic even though the positive cases are increasing because we have succeeded in curbing the death rate aiims doctor guleria News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x