12 December 2024 2:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

राजदीप सरदेसाईंकडून प्रणव मुखर्जीच्या मृत्यूचं ट्विट | नंतर माफी | कुटुंबियांकडून खेद व्यक्त

Fake news tweet, Pranab Mukherjee, Rajdeep Sardesai, apologized

नवी दिल्ली, १३ ऑगस्ट : भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी कोमात गेले आहेत. त्यांच्या प्रकृतीत अद्याप काहीही सुधारणा झालेली नाही. त्यांना व्हेंटिलेटरवरच ठेवण्यात आलं आहे. आर्मी रुग्णालयाने ही माहिती दिली. त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा नसल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. एएनआयने या संदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. १० ऑगस्टपासून प्रणव मुखर्जी यांची प्रकृती बिघडली आहे. १० तारखेच्या एक दिवस आधीच त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. १० ऑगस्ट रोजी त्यांच्या मेंदूत असलेल्या गाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीत काहीही सुधारणा झालेली नाही. आता ते कोमात गेले आहेत असं आर्मी रुग्णालयाने स्पष्ट केलं आहे.

दरम्यान पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी आज माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबाबत चूक बातमी ट्विट केली. यासाठी ट्रोल झाल्यानंतर त्यांना माफी मागावी लागली. प्रणव मुखर्जी यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर दिल्ली येथील लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पत्रकार राजदीप सरदेसाई यांना कुठून तरी मुखर्जी यांच्या निधनाची बातमी कळली आणि त्यांनी लगेच ट्विट करून प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली अर्पण केली.

यानंतर, प्रणव मुखर्जी यांच्याबद्दल खोटी बातमी व्हायरल केल्याबद्दल नेटीजन्सने सरदेसाई यांना ट्रोल करणे सुरू केले. चूक लक्षात आल्यानंतर सरदेसाई यांनी दुसरे ट्विट करून क्षमा मागितली.

दरम्यान, प्रणव मुखर्जी यांचे चिरंजीव अभिजित आणि कन्या शर्मिष्ठा यांनी राजदीप यांचे नाव न घेता त्यांच्या ट्विटबद्दल नाराजी व्यक्त केली.

 

News English Summary: Journalist Rajdeep Sardesai today tweeted the wrong news about the death of former President Pranab Mukherjee. He had to apologize after being trolled for this. Pranab Mukherjee is in critical condition. He is undergoing treatment at a military hospital in Delhi.

News English Title: Fake news tweets about Pranab Mukherjee Rajdeep Sardesai apologized News latest Updates.

हॅशटॅग्स

#FakeNews(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x