14 December 2024 2:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

शेतकऱ्यांना वाढता पाठिंबा | बिथरलेले केंद्रीय कृषी राज्यमंत्री म्हणाले ते शेतकरी खरे नाहीत

Farmers protesting, Not a real farmers, Union MoS Agriculture Kailash Choudhary

नवी दिल्ली, ६ डिसेंबर: दिल्लीच्या सीमेवर गेल्या 10 दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी 8 डिसेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. त्यावर काँग्रेसनं आज अधिकृतरित्या शेतकऱ्यांच्या भारत बंदला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये काँग्रेसही सहभागी होणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी दिली आहे. काँग्रेसबरोबरच टीआरएस आणि आम आदमी पक्षानंही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.

“8 डिसेंबरला होणाऱ्या भारत बंदला काँग्रेस पक्षाचं समर्थन असेल. आम्ही आमच्या पक्ष कार्यालयांबाहेरही आंदोलन करणार आहोत. शेतकऱ्यांच्या समर्थनात राहुल गांधींनी टाकलेलं हे मजबूत पाऊल असेल. शेतकऱ्यांनी पुकारलेला भारत बंद आणि आंदोलन यशस्वी होण्यासाठी आम्ही प्रयत्न करु,” असं पवन खेडा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

मात्र शेतकरी आंदोलनाला मिळणार पाठिंबा पाहता केंद्र सरकारमधील मंत्री देखील धास्तावल्याने धक्कादायक विधान करून संशयाचं वातावरण निर्माण करत आहेत. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी किमान समर्थन मूल्य कायम ठेवण्याबाबत केंद्र सरकार लिखित आश्वासन देण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. मात्र हे सांगत असताना मंत्र्यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. “आंदोलन करणारे शेतकरी हे खरे शेतकरी असल्याचं आपल्याला वाटत नाही. शेतात काम करणारे खरे शेतकरी याबाबत चिंतेत आहेत असं आपल्याला वाटत नाही” असं कैलाश चौधरी यांनी म्हटलं आहे.

 

News English Summary: Union Minister of State for Agriculture Kailash Chaudhary has said that the Union government is ready to give a written assurance to maintain the minimum support price. But while saying this, the minister has made a controversial statement. “We don’t think the agitating farmers are real farmers. We don’t think the real farmers working in the fields are worried about it,” said Kailash Chaudhary.

News English Title: Farmers protesting are not real farmers says Union MoS Agriculture Kailash Choudhary News Updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x