20 April 2024 1:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Shares | सुवर्ण संधी! फुकट शेअर्स मिळतील, या कंपनीबाबत फ्री बोनस शेअर्सची अपडेट, अल्पावधीत पैसा वाढवा Reliance Power Share Price | 4 वर्षात 1 लाखावर 25 लाख रुपये रिटर्न देणारा शेअर पुन्हा तेजीत येणार? तज्ज्ञांचा अंदाज काय? Penny Stocks | अवघ्या 63 पैसे ते 9 रुपये किमतीचे टॉप 10 पेनी शेअर्स श्रीमंत करतील, रोज अप्पर सर्किट हीट Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! तज्ज्ञांकडून इंडियन हॉटेल्स शेअर्सवर 'बाय' रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर Infosys Share Price | भरवशाचा इन्फोसिस शेअर उसळी घेणार, दिग्गज ब्रोकिंग तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची महिलांच्या फायद्याची खास योजना, अल्पावधीत मिळतील 2,32,044 रुपये Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना 'या' बँकेत FD वर बंपर परतावा, तब्बल 9.50 टक्क्यांपर्यंत व्याज मिळवा
x

राज्यपाल आणि गहलोत भेटीमुळे राजस्थानात विधानसभेच्या विशेष अधिवेशनाची शक्यता

Rajasthan Govt, CM Ashok Gehlot, Floor Test

जयपूर, १९ जुलै : राजस्थानमध्ये सत्तेसाठीचा संघर्ष हा एक रोचक वळणावर आला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयही वेगाने बदलणार्‍या राजकीय घडामोडींमध्ये सक्रिय झाले आहे. गृहमंत्रालयाने राजस्थानच्या मुख्य सचिवांना फोन टॅपिंग प्रकरणी अहवाल देण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यपाल कलराज मिश्रा यांची भेट घेऊन बहुमताचा दावा केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सरकार बुधवारी किंवा गुरुवारी विधानसभेचे अधिवेशन बोलवू शकते आणि यावेळी फ्लोर टेस्ट होऊ शकते.

राजस्थानच्या राजकारणात आता मुगले-आझम, अनारकली आणि लगान दाखल झाले आहेत. जयपूरमधील हॉटेल फेअरमाउंट येथे गेहलोट कॅम्पच्या आमदारांना ‘मुगले आजम’ हा चित्रपट दाखवला. त्यानंतर लगान हा चित्रपट दाखविण्यात आला. इतकेच नाही तर महिला आमदारांनी हॉटेलच्या स्वयंपाकघरातल्या आचारीकडून स्वयंपाकाचे धडे ही घेतले. हॉटेलमध्ये असं चित्र आहे, पण राजस्थानमध्ये अजूनही सत्तेच्या युद्धाचे चित्र आहे. केंद्रीय गृह मंत्रालय घोडे बाजाराच्या संबंधित कथित फोन टॅपिंग प्रकरणात सक्रिय झाले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी एक पाऊल पुढे टाकलं आहे. गेहलोत बहुमत सिद्ध करण्यासाठी विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी त्यांनी राज्यपाल कलराज मिश्र यांची भेट घेतली असून १०३ आमदारांच्या समर्थनाचे पत्रही दिले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक गहलोत शनिवारी सांयकाळी राज्यपालांची भेट घेत १०३ आमदारांचे समर्थन असल्याचे पत्र दिले आहे. पण, अद्यापपर्यंत राजभवनाकडून ही फक्त एक सदिच्छा भेट होती, असं सांगण्यात आलं आहे. मात्र, राज्यपाल आणि गहलोत यांच्या भेटीमुळे राजस्थानमध्ये वेगवेगळ्या राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

स्थानिक प्रसार माध्यमांच्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राज्यपालांना राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर येत्या बुधवारी विशेष विधानसभा अधिवेशन बोलवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे.

 

News English Summary: Chief Minister Ashok Gehlot has taken a step forward. Gehlot is preparing to convene a special session of the Legislative Assembly to prove his majority. For this, he has met Governor Kalraj Mishra and has also given letters of support to 103 MLAs.

News English Title: Floor test possibilities in Rajasthan after meet of Governor and CM Ashok Gehlot News latest Updates.

हॅशटॅग्स

#SachinPilot(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x