11 December 2024 5:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL
x

CAB २०१९ आणि NRC भारतीयांमध्ये फूट पाडणारी अस्त्रे: राहुल गांधी

MP Rahul Gandhi, CAB 2019, NRC Law

नवी दिल्ली: नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरुद्ध विद्यार्थ्यांची हिंसक निदर्शने आणि विद्यापीठ परिसरातील वाढता तणाव लक्षात घेऊन दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या असून ५ जानेवारीपर्यंत विद्यापीठाला हिवाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाविरोधात रविवारी दिल्लीतील जामिया विद्यापीठाच्या परिसरात जोरदार निदर्शनं झाली व हिंसाचार उफाळला होता. या पार्श्वभूमीवर रात्री उशीरा ताब्यात घेण्यात आलेल्या जवळपास ५० निदर्शकांना सोमवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी सोडले आहे. दुसऱ्या दिवशीही जामिया विद्यापीठामधील वातावरण तापलेले आहे.

जामिया मिलिया विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या संघटनांनी या हिंसाचाराशी विद्यार्थ्यांचा काही संबंध नाही. कॅम्पसबाहेरचे हे आंदोलन व हिंसाचार स्थानिक लोकांनी केले व बदनाम करण्यासाठी त्याचे खापर आमच्यावर फोडले, असा आरोप विद्यार्थी संघटनेने केला. एनएसयूआयचे राष्ट्रीय सचिव सैमन फारुकी प्रसार माध्यमांना म्हणाले की, आंदोलक मथुरा रोडवर शांततापूर्ण आंदोलन करत होते. आंदोलक-पोलिसांमध्ये वाद झाला. तणावात त्यामुळे वाढ झाली. पोलिसांनी लाठीमार सुरू केला. संतप्त जमावाने त्यामुळे बसेस जाळल्या.

दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी ट्विट करून मोदी सरकारवर संताप व्यक्त केला आहे. मोदी सरकारनं लागू केलेल्या नागरिकत्व दुरूस्ती कायदा आणि एनआरसी कायदा हे दोन्ही कायदे भारतीयांमध्ये फूट पाडणारी अस्त्रे असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे. त्याचबरोबर याचा विरोध करण्यासाठी अहिंसक मार्गानं सत्याग्रह करणे हाच चांगला मार्ग आहे, असंही राहुल गांधी म्हणाले आहेत.

 

Web Title:  Former Congress President Rahul Gandhi Says The CAB NRC Are The Weapons of Mass Polarization Unleashed by Fascists on India Democracy

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x