26 October 2021 4:10 AM
अँप डाउनलोड

कोरोना प्रकोपाच्या कारणाने या तारखेला शाळा पुन्हा सुरू होण्याची शक्यता

Government, reopen schools and colleges, Corona Virus

नवी दिल्ली, ५ जून : देशातच नाही तर संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता देशातील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. परंतू आता यंदाच्या शैक्षणिक सत्रासाठी शाळा आणि महाविद्यालये पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारने हलचाली सुरू केल्या आहेत. सर्व प्रथम सीबीएसई बोर्डाचे निकाल घोषित करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांचे निकाल काही दिवसांच्या अंतरावर घोषित करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे कोरोना व्हायरसचा प्रकोप लक्षात घेत ऑगस्ट महिन्याच्या १५ तारखेला शाळा पुन्हा नव्याने सुरू करण्याचा निर्णय घेण्याच्या विचारात सरकार आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आम्ही अशी आशा करतो की १०वी आणि १२वीचे निकाल १५ ऑगस्ट पर्यंत लागतील. शिवाय ऑगस्ट महिन्यात शाळा पुन्हा उघडण्याच्या निर्णयावर देखील चर्चा सुरू आहे. परंतु सद्य परिस्थिती लक्षात घेवून योग्य तो निर्णय घेतला जाईल.’ असं ते म्हणाले.

अनलॉक 1 नंतर देशातील अनेक ठिकाणी जनजीवन सुरळीत होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामध्ये देशातील शाळांबाबत मोठी बातमी समोर आली आहे. HRD मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. 3 जून रोजी झालेल्या मुलाखतीत त्यांनी देशातील शाळा आणि महाविद्यांबाबत मोठा खुलासा केला आहे. कोरोनाच्या महासाथीत 16 मार्चपासून देशातील शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. ऑगस्ट 2020 नंतर शाळा व महाविद्यालये पुन्हा सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तब्बल 33 कोटी विद्यार्थी शाळा केव्हा सुरू होणार याची वाट पाहत आहेत. पालक व शिक्षकांसोबत झालेल्या चर्चेनंतर एचआरडी मंत्री रमेश निशंक पोखरिया यांनी शाळा आणि महाविद्यालये ऑगस्टनंतर पुन्हा सुरू होणार असल्याचे सांगितले. त्यातही 15 ऑगस्टनंतर शाळा व महाविद्यालये सुरू होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय 15 ऑगस्टपर्यंत सर्व परीक्षांचा निकाल देण्याचा प्रयत्न करत असल्याचे मंत्र्यांनी सांगितले.

 

News English Summary: The corona virus has spread not only in the country but all over the world. The government had decided to close all educational institutions in the country in view of the growing outbreak of corona. But now the government has started moving to reopen schools and colleges for this academic session. First of all, the CBSE board is expected to announce the results.

News English Title: Government has started moving to reopen schools and colleges for this academic session News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x