11 December 2024 5:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

IT आणि BPO क्षेत्रात काम करणाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची मुभा वाढवली

Govt extends, work frame home, concession to IT BPO companies

नवी दिल्ली, २२ जुलै : जून महिन्याच्या सुरुवातीपासून देशातील अनलॉकचे टप्पे सुरू झाल्यापासून कोरोनाच्या फैलावाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी उद्योगधंदे तसेच खासगी कार्यालये सुरू करण्याची परवानगी देण्यात आल्याने अर्थचक्र हळूहळू रुळावर येऊ लागले आहे. दरम्यान, कोरोनाच्या या संकटकाळाच ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धतीने काम करणाऱ्यांबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

मंगळवारी याबाबतच अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. ज्याअंतर्गत IT आणि BPO या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत घरुनच काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. ३१ जुलै रोजी या सुविधेचा अखेरचा दिवस होता. पण, आता मात्र Work from home मध्ये वाढ करुन देण्यात आल्याचंच स्पष्ट होत आहे.

दूरसंचार विभागाकडून ट्विट करत याबाबतची माहिती देण्यात आली. सद्यस्थितीला या क्षेत्रांमध्ये काम करणारे जवळपास ८५ टक्क्यांहून जास्त कर्मचारी हे घरूनच काम करत आहेत. तर, अत्यावश्कत असल्या कारणामुळं इतर कर्मचाऱ्यांना कार्यालयात जावं लागत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर सरकारने वर्क फ्रॉम होम पद्धतीने काम करण्याची परवानगी विविध कंपन्यांना दिली होती. त्यानंतर वर्क फ्रॉम होमसाठीची मुदत ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आली होती. दरम्यान, ही मुदत आता संपत असल्याने सरकारकडून वर्क फ्रॉम होमला अजून मुदतवाढ देण्यात आली आहे. आता वर्क फ्रॉम होमसाठीचे नियम आणि अटी ३१ डिसेंबर २०२० पर्यंत लागू राहणार आहेत.

 

News English Summary: Those working in the IT and BPO sectors are allowed to work from home till December 31. July 31 was the last day of this facility. But now it is becoming clear that work from home has been increased.

News English Title: Govt extends work frame home concession to IT BPO companies till December 31 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x