20 April 2024 1:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

कपड्यावरून स्तनांना स्पर्श करणं लैंगिक शोषण नाही | त्या निकालवरून महिलेने जजला पाठवले कंडोम

Gujarat woman, 150 condoms, justice Pushpa Ganediwala, Controversial Pocso

अहमदाबाद, १९ फेब्रुवारी: काही दिवसांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. पुष्‍पा व्ही. गनेडीवाला यांनी अल्पवयीन मुलीच्या कपड्यावरून तीच्या स्तनांना स्पर्श करणे हे पॉक्‍सो कायद्याअंतर्गत लैंगिक शोषण नाही, असा अजब निकाल दिला होता. त्यांच्या या निर्णयावर खूप टीका झाली. न्यायाधिशांच्या या निर्णयावर नाराज होऊन गुजरातच्या देवश्री त्रिवेदी या महिलेने त्यांना १५० कंडोम पाठवले आहेत.

देवश्री यांनी वेग-वेगळ्या बारा ठिकाणी कंडोम पाठवले आहेत. याशिवाय, त्यांनी नागपूर खंडपीठाच्या रजिस्ट्रीतही कंडोम पाठवले आहेत. इंडिया टुडेशी बोलताना देवश्री म्हणाल्या की, त्या अशाप्रकारचा अन्याय सहन करणार नाहीत. न्यायमूर्ती गनेडीवाला यांच्यामुळे एका अल्पवयीन मुलीला न्याय मिळाला नाही. देवश्री यांनी न्या.गनेडीवाला यांना पदच्यूत करण्याची मागणी केली आहे.

मागील नऊ फेब्रुवारीला कंडोम पाठवले असल्याचे देवश्री यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, ‘एक महिला म्हणून मी काही चुकीचे केले आहे, असे मला वाटत नाही. मला याचा कसलाच पश्चाताप नाही. स्त्रियांनी आपल्या हक्कांसाठी झगडायला हवे. न्या. गनेडीवालाच्या या निर्णयामुळे लैंगिक शोषण करणाऱ्या पुरूषांना शिक्षा होणार नाही.

देवश्री यांना आपल्या या वर्तणुकीसाठी शिक्षाही केली जाऊ शकते. नागपूर खंडपीठाच्या रजिस्‍ट्री ऑफिसने त्यांना कंडोम मिळाले नसल्याचे स्पष्ट केले आहे. तथापि, नागपूर बार असोसियेशनचे ज्येष्ठ वकिल श्रीरंग भांडारकर म्हणाले की, हा मानहानीचा मुद्दा आहे. त्यामुळे आम्ही या महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

 

News English Summary: A few days ago, Justice of the Mumbai High Court. Pushpa V. Ganediwala had given the bizarre conclusion that touching the breasts of a minor girl through her clothes was not sexual abuse under the Pocso Act. His decision was widely criticised. Angered by the judge’s decision, Devashree Trivedi from Gujarat sent him 150 condoms.

News English Title: Gujarat woman send 150 condoms to justice Pushpa Ganediwala to protest controversial Pocso decision news updates.

हॅशटॅग्स

#Court(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x