19 April 2024 2:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Chemicals Share Price | टाटा केमिकल्स सह हे तीन शेअर्स फायद्याचे ठरतील, तज्ज्ञांनी काय म्हटले जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर 13 रुपयांवर आला, आता IIFL ब्रोकरेज फर्मने टार्गेट प्राइस केली जाहीर Reliance Power share Price | अल्पावधीत 2400% परतावा देणारा रिलायन्स पॉवर शेअर होल्ड करावा की बाहेर पडावे? Samvardhana Motherson Share Price | 18 पैशाच्या शेअरची जादू! गुंतवणुकदार झाले करोडपती, पुढेही फायद्याचा स्टॉक Mastek Share Price | 40 रुपयाच्या शेअरची कमाल! तब्बल 4000 टक्के परतावा दिला, आता एका दिवसात 20% वाढला Infosys Share Price | भरवशाचे टॉप 7 शेअर्स स्वस्त झाले, पण व्हॉल्यूम लाखोमध्ये, संयम राखल्यास मिळेल मल्टिबॅगर परतावा IREDA Share Price | IREDA शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, सर्किट फिल्टरही वाढला, स्टॉक तुफान तेजीत येणार?
x

भांडं फुटलं | शेतकऱ्यांना विरोध करणारे स्थानिक नव्हे तर 'हिंदू सेनेचे' कार्यकर्ते

Hindu Sena, Sindhu Border, Protesting farmers, Vishnu Gupta

नवी दिल्ली, २९ जानेवारी: शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या अश्रूंनी पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाला धार चढली आहे. सरकार पोलीस प्रशासनाच्या मदतीने शेतकरी आंदोलन दडपत आहे, असा गंभीर आरोप राकेश टिकैत यांनी केला होता. सरकार आणि पोलिसांच्या दबावामुळे संयमाचा बांध फुटलेल्या राकेश टिकैत यांना अश्रू अनावर झाले. हेच अश्रू खचलेल्या शेतकऱ्यांसाठी पुन्हा उमेद देणारे ठरले आहेत. गाझीपूरमध्ये शेतकरी पुन्हा एकवटण्यास सुरुवात झाली.

दिल्लीमध्ये असलेल्या शेतकरी आंदोलनामध्ये पुन्हा एकदा हिंसाचार झाला आहे. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास स्थानिक नागरिक शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी घोषणाबाजीला सुरूवात केली. शेतकऱ्यांनी सिंघू बॉर्डर खाली करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली. शेतकरी आंदोलनामुळे आमचा व्यवसाय ठप्प झाला आहे, असा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. 1.45 च्या सुमारास स्थानिक शेतकऱ्यांच्या तंबूजवळ गेले आणि त्यांचं सामान तोडायला सुरूवात केली. यानंतर शेतकरी आणि स्थानिकांमध्ये हाणामारीला सुरूवात झाली, ज्यात दगडफेकही करण्यात आली.

त्यानंतर सर्वत्र शेतकऱ्यांना स्थानिकांचा विरोध असं वृत्त पसरण्यास सुरुवात झाली. मात्र त्यानंतर एक धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. संबंधित विरोध स्थानिकांचा असल्याचं या विरोधासाठी ‘हिंदू सेनेने’ स्वतःचे कार्यकर्ते जमावल्याचं समोर आलं आहे. त्यात काही स्थानिकांना जवळ करून समाज माध्यमांवर स्थानिकांचा विरोध असे वृत्त पसरवले. मात्र याच ‘हिंदू सेने’चा संस्थापक असलेल्या विष्णू गुप्ता याने ट्विट केलं आणि सर्व वास्तव समोर आलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना स्थानिकांनी नव्हे तर हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी विरोध केल्याचं समोर आलं आहे.

 

News English Summary: The farmers’ agitation in Delhi has once again turned violent. Around one o’clock in the afternoon, the local citizens reached the place of the farmers’ agitation and started chanting slogans. The locals demanded that the farmers should lower the Singhu border. The locals are alleging that our business has come to a standstill due to the farmers’ agitation. Around 1.45 am, they went near the tent of the local farmers and started breaking their belongings. This was followed by clashes between farmers and locals, including stone pelting.

News English Title: Hindu Sena karyakarta protest at Sindhu Border against protesting farmers said Vishnu Gupta news updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x